Next
‘टाटा कम्युनिकेशन्स’चा ‘आयओटी इकोसिस्टीम’मध्ये पुढाकार
प्रेस रिलीज
Thursday, May 30, 2019 | 01:22 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : ‘टाटा कम्युनिकेशन्स’ने इंटरनेट ऑफ थिंग्स (आयओटी) मार्केटप्लेसची सुरुवात करत असल्याची घोषणा नुकतीच केली. अशा प्रकारचा भारतातील पहिलाच उपक्रम असून, देशात मोठ्या प्रमाणावर विकसित होत असलेल्या ‘आयओटी इकोसिस्टीम’ला मजबूत करणे व त्याच्या विकासाला अधिक वेग प्राप्त करवून देणे हा यामागचा उद्देश आहे. 

या माध्यमातून ‘आयओटी’ प्रॅक्टिशनर्स व ग्राहकांना एकाच मंचावर एकत्र आणले जाणार असून, ग्राहकांना त्यांच्या गरजांनुसार ‘आयओटी’ सुविधा, उपाययोजना निवडता येतील व आपापल्या व्यवसायांमध्ये नवनवीन उपक्रम राबवता येतील. त्याचवेळी आयओटी मार्केटप्लेस व्हेंडर्स व भागीदारांना बाजारपेठेतील नवनवीन संधी शोधण्यासाठी सक्षम करेल.

‘आयओटी बाजारपेठेत मानके, मापदंड, अंतर्गत संचालन क्षमता व एकमेकांशी जोडले जाण्याच्या क्षमतेचा अभाव आहे आणि दुसरीकडे कितीतरी उद्यम, तंत्रज्ञाने व प्लॅटफॉर्म्स बाजारपेठेतील हिस्सा व जास्तीत जास्त ग्राहक काबीज करण्यासाठी स्पर्धा करत आहेत. ही तफावत भरून काढण्याची आवश्यकता आहे व भारतात ‘आयओटी’ची मोठ्या प्रमाणावर वाढ व्हावी यासाठी एक सर्वसमावेशक उपाययोजना केली गेली पाहिजे. या गरजा पूर्ण करणे आणि त्यासाठी डिव्हाइस उत्पादकांपासून, सॉफ्टवेअर डेव्हलपर्स, स्टार्ट-अप्स, सिस्टीम इंटेग्रेटर्स यांना एकत्र आणून ‘आयओटी’ उपाययोजना राबवल्या जाव्यात, एकाच ठिकाणी त्यांचे व्यवस्थापन व्हावे हा ‘टाटा’च्या ‘आयओटी’ मार्केटप्लेसचा उद्देश आहे. ‘टाटा’ व त्यांनी देशभरात निर्माण केलेल्या पायाभूत सोयी-सुविधांमार्फत इकोसिस्टीममधील त्यांचे सहयोगी सर्वसमावेशक उपाययोजना सादर करतील.

या ‘आयओटी’ मार्केटप्लेसमुळे सरकारी-सार्वजनिक क्षेत्रातील ग्राहकांपासून ते उद्योजक व स्टार्ट-अप्सपर्यंत वेगवेगळ्या ग्राहकांना प्लग अँड प्ले मॉडेलमध्ये विविध प्रकारच्या सेवा सुविधा मिळतील. आपापल्या खास गरजा पूर्ण करण्यासाठी ते ‘आयओटी’ उपाययोजनांचा वापर करून घेऊ शकतील.

‘टाटा कम्युनिकेशन्स’च्या ‘आयओटी’चे प्रमुख आलोक बार्डिया म्हणाले, ‘‘आयओटी’ क्षेत्रातील सर्वोत्तम व्यावसायिकांना बीटूबी मार्केटप्लेसमध्ये एकत्र आणून आम्ही भारतात ‘आयओटी’चा प्रभाव जास्तीत जास्त वाढावा यासाठी भक्कम पाया बांधत आहोत. अशा प्रकारच्या या पहिल्याच उपक्रमामुळे या क्षेत्रातील तफावत भरून निघेल, एखादी उपाययोजना तयार करण्यात किंवा ती विकत घेण्यात एकीकृत अनुभव निर्माण करण्यासाठी विविध ‘आयओटी’ घटक त्यामुळे एकत्र आणले जातील. त्यामुळे ग्राहकांना या उपाययोजनांचा सहजपणे लाभ घेता येईल व ‘आयओटी’चा वापर करून त्यांची धोरणात्मक उद्दिष्ट्ये पूर्ण करता येतील.’

‘आयओटी’वर आधारित पर्यावरणात्मक सुविधा प्रदान करणारे स्टार्ट-अप ओयझोमचे चीफ मार्केटिंग ऑफिसर जैनम मेहता म्हणाले, ‘टाटा कम्युनिकेशन्सच्या ‘आयओटी मार्केटप्लेस’ उपक्रमात सहभागी होताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. या रेडी चॅनेलमुळे आम्हाला भारतीय बाजारपेठेतील ज्या ‘आयओटी’ संधींचा आजवर लाभ घेतला गेला नाही त्यांच्यापर्यंत पोहोचता येईल. त्याचप्रमाणे आमची उत्पादने व विक्री धोरणे भविष्यातील आव्हाने स्वीकारण्यासाठी पूर्णपणे तयार करण्यासाठी आम्हाला मोलाची मदत मिळेल. या प्लॅटफॉर्ममुळे आम्हाला बाजारपेठेबद्दलची जागरूकता वाढवता येईल, आमचा दृष्टिकोन व्यापक होईल, तसेच उद्योगक्षेत्रात अधिक दूरपर्यंत आम्ही मजल मारू शकू. यामुळे आम्हाला आमच्या इतर भागीदारांसोबत अधिक घनिष्ठ संबंध प्रस्थापित करता येतील व त्यातून आम्ही आमच्या ग्राहकांना सर्वसमावेशक व असीमित अनुभव एकाच ठिकाणी प्रदान करू शकू.’ 

सुपरटेक इन्स्ट्रुमेंटेशन सर्व्हिसेसचे (इंडिया) संचालक चंद्रशेखर लिमये म्हणाले, ‘सध्या विस्कळीत स्थितीत असलेल्या ‘आयओटी’ क्षेत्रात संघटितपणा व सुव्यवस्था आणण्यासाठी ‘टाटा’ एक सक्षम आयओटी प्लॅटफॉर्म उभारत आहे जो भारतातील आयओटी इकोसिस्टिमचा कणा बनून उभा राहील. धोरणात्मक भागीदार म्हणून त्यांना सहयोग करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. हा प्लॅटफॉर्म अतिशय विशाल व व्यापक असल्यामुळे आम्ही नाविन्यपूर्ण व कमी खर्चाच्या आयओटी सुविधा निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करू शकतो ज्यामुळे उद्योगक्षेत्राला क्षमतेबाबत भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करता येईल.’

‘टाटा’ भारतात आपल्या एलपीडब्ल्यूएएन नेटवर्कमार्फत आयओटीचा पाया उभारत आहे. हे एलपीडब्ल्यूएएन नेटवर्क जवळपास दोन हजार कम्युनिटीज व ४०० मिलियन लोकांपर्यंत पोहोचलेले आहे. आजच्या घडीला कंपनीने आपले नेटवर्क ४५ शहरांमध्ये पोहोचवलेले असून, पुढील दोन वर्षांत अजून जास्त शहरांचा त्यामध्ये समावेश केला जाईल. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search