Next
फेडेक्स ठरली काम करण्यासाठी सर्वोत्तम कंपनी
प्रेस रिलीज
Monday, July 02 | 06:06 PM
15 0 0
Share this story

पुणे : फेडेक्स कॉर्प.ची उपकंपनी असलेली आणि जगातील सर्वात मोठी जलद वाहतूक (एक्स्प्रेस ट्रान्सपोर्टेशन) करणारी कंपनी असलेल्या ‘फेडेक्स एक्स्प्रेस’ची ‘ग्रेट प्लेस टू वर्क इन्स्टिट्यूट’तर्फे काम करण्यासाठी सर्वोत्कृष्ट कंपनी म्हणून निवड करण्यात आली आहे.

ग्रेट प्लेस टू वर्क इन्स्टिट्यूटने सातशेहून अधिक कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांकडून घेतलेला गोपनीय अभिप्राय आणि ऑडिट व्यवस्थापन प्रक्रियेवर हा निष्कर्ष आधारित आहे. ‘भारतातील सर्वोत्कृष्ट कंपन्यांमध्ये फेडेक्स एक्स्प्रेसची वर्णी लागल्याबद्दल मला अत्यंत अभिमान वाटत आहे. काम करण्यासाठीची भारतातील सर्वोत्तम कंपनी म्हणून निवड होणे म्हणजे उत्कृष्ट सेवा देण्यासाठी प्रोत्साहित करणाऱ्या आमच्या येथे असलेल्या कार्यसंस्कृतीला मिळालेली पावतीच आहे’, अशी भावना भारतातील फेडेक्स एक्स्प्रेसचे उपाध्यक्ष फिलीप चेंग यांनी व्यक्त केली.

‘आमचे कर्मचारी हीच आमची मौल्यवान संपत्ती आहे आणि त्यांचा व्यक्तिगत आणि व्यावसायिक पातळीवर विकास होण्यासाठी पोषक ठरणारे सकारात्मक व कामाचे चीज करणारे वातावरण त्यांना मिळेल याची आम्ही खात्री देतो. हा किताब मी फेडेक्समधील प्रत्येक कर्मचाऱ्याला अर्पण करतो, ज्यांनी आपल्या उत्साहाने आणि बांधिलकीने हे ध्येय साध्य करण्यासाठी योगदान दिले. या कंपनीवर असलेला आमच्या टीमचा संपूर्ण विश्वास आणि त्यांचे निर्विवाद सहकार्य यामुळे आमची कंपनी खरच ‘ग्रेट प्लेस टू वर्क’ (काम करण्याचे उत्तम ठिकाण) झाली आहे.या मानांकनामुळे फेडेक्सची मनुष्यबळाप्रती असलेली बांधिलकी दिसून येते. पीपल-सर्व्हिस-प्रॉफिट ही त्रिसूत्री हा फेडेक्स एक्स्प्रेसच्या कार्यप्रणालीचा पाया आहे. आपल्या कर्मचाऱ्यांसाठी सकारात्मक वातावरण तयार करा आणि ते ग्राहकांना सर्वोत्तम सेवा प्रदान करतील. परिणामी, उत्तम नफा होईल आणि हा नफा पुन्हा एकदा व्यवसाय आणि मनुष्यबळासाठी गुंतवता येऊ शकेल, या तत्वावर ही त्रिसूत्री आधारलेली आहे’, असेही चेंग यांनी नमूद केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link