Next
‘त्यांच्या’ कलाविष्काराने केले थक्क
BOI
Monday, April 02 | 06:45 PM
15 0 0
Share this story

प्रसन्न ऑटिझम सेंटरपुणे : जागतिक स्वमग्नता जागरूकता दिन अर्थात ‘वर्ल्ड ऑटिझम अवेअरनेस डे’चे औचित्य साधून पुण्यातील प्रसन्न ऑटिझम सेंटरमध्ये दोन एप्रिलला विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. स्वमग्न (ऑटिस्टिक) मुलांनी बनविलेल्या कलाकुसरीच्या विविध वस्तू, त्यांनी काढलेली चित्रे यांच्यासह त्यांच्या कलेचे विविध आविष्कार या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळाले.

दर वर्षी हे प्रदर्शन आयोजित केले जाते. मुलांनी स्वत:च्या हाताचे अंगठे रंगांत बुडवून त्याचे ठसे उमटवून तयार केलेली सुंदर अशी झाडाची कलाकृती, आइस्क्रीमच्या काड्यांवर स्केच पेनने काढलेली वेगवेगळ्या प्राण्यांची चित्रे, सुतळ, डाळी, कागदाचे कपटे, पुठ्ठे, रंग आदींचा कल्पक, वापर करून साकारलेली चित्रे, कॅलेंडर, पुठ्ठ्याचे घर अशा मुलांनी तयार केलेल्या अनेक वस्तू प्रदर्शनामध्ये मांडण्यात आल्या होत्या. 

मुलांनी बनविलेल्या कलाकुसरीच्या विविध वस्तूस्वमग्नतेबाबत जागरूकता निर्माण करणारे ‘टी-शर्टस्’देखील प्रदर्शनस्थळी विक्रीसाठी उपलब्ध होते. ‘त्या टी-शर्ट खरेदीतून नागरिकही स्वमग्न मुलांच्या विकासाला हातभार लावू शकतात आणि त्याबद्दल जागरूकता निर्माण करू शकतात,’ असे प्रसन्न ऑटिझम सेंटरच्या व्यवस्थापकीय संचालिका साधना गोडबोले यांनी सांगितले. 


ऑटिस्टिक मुलांना कसे समजून घेतले पाहिजे, त्यांना कसे शिकवले पाहिजे याची माहिती देणारे तक्ते येथे लावण्यात आले होते. न्यूटन, आइन्स्टाइन, व्हॅन गॉग यांच्यासारखी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात नाव कमावलेली मंडळीही ऑटिस्टिक होती, याची माहितीही तेथे देण्यात आली होती.

‘या मुलांना खेळांच्या माध्यमातून अनेक गोष्टी समजावून सांगितल्या जातात. उदा. एका डब्यामध्ये अर्धा डबा गहू भरून त्यात पेन, चमचा, तसेच अनेक लहान-मोठ्या गोष्टी त्यात टाकून मुलांना ठरावीक वस्तू डब्यातून बाहेर काढायला सांगितले जाते. अशा प्रकारे त्यांना नवीन नवीन गोष्टी शिकवल्या जातात,’ अशी माहिती तेथील सहायकांनी दिली.

(या प्रदर्शनाची झलक आणि डॉ. साधना गोडबोले यांचा बाइट पाहा सोबतच्या व्हिडिओत...)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link