Next
‘आयएमडी वन’ संस्थेला व्हीव्हीएस लक्ष्मणचे सहकार्य
प्रेस रिलीज
Wednesday, April 03, 2019 | 03:19 PM
15 0 0
Share this article:

क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण समवेत ‘आयएमडी वन’ संस्थेचे संचालक संदीप जोशी, संस्थापक जगदीश सोनगारा व संचालक विजय उटाडीया

पुणे : ‘आइदिआ टेक्नोवेशन्स’च्या ‘आयएमडी वन’ या संस्थेला क्रिकेट प्रशिक्षण विभागाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण सहकार्य करणार आहे. 

भारतातील सर्वात मोठी आणि झपाट्याने वाढणारी फोटोग्राफी प्रशिक्षण संस्था ‘डीसीपी एक्सपीडिशन्स’शी आइदिआ टेक्नोवेशनने हातमिळवणी केली आहे. डीसीपीमध्ये अनेक सन्मानित सल्लागार आणि तज्ज्ञांचा समावेश असलेले पॅनेल आहे. यामध्ये वन्यजीव, पर्यटन, खाद्यपदार्थ, खगोलशास्त्र, फॅशन, फोटोग्राफर, फोटोजर्नलिस्ट्स, डिजिटल आर्टिस्ट, डिजिटल इमेजिंग स्पेशालिस्ट, प्रवासी, लेखक, भटकंती करणारे, निसर्गवादी, संरक्षणवादी आणि इतर तज्ञांचा समावेश आहे. डॉ. सीझर सेनगुप्ता, अमित राणे,  युवराज गुर्जर, मोहन थॉमस, आशुतोष शिंदे, सनक रॉय चौधरी, किरण पूनाचा असे अनेक सुप्रसिद्ध छायाचित्रकार ‘डीसीपी’शी जोडलेले आहेत. 

‘डीसीपी’ ही संस्था फोटो टूर्स, प्रदर्शने आणि इतर अनेक उपक्रमांसह भारतात अनेक ठिकाणी नियमित छायाचित्र प्रदर्शन भरवत असते. ‘डीसीपी’ आणि ‘आयएमडी वन’ हे भविष्यात  फोटोग्राफी क्षेत्रात अभ्यासक्रमाची रचना करणे, स्पर्धा/ प्रदर्शने यांचे आयोजन करणे; तसेच डीसीपी तज्ञांतर्फे ‘आयएमडी वन’च्या डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करून प्रमाणित अभ्यासक्रम देणे असे उपक्रम राबवण्यात येणार आहेत. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search