Next
चिमुकल्यांनी केली मामाच्या गावची सफर
सेवा मित्र मंडळ ट्रस्टतर्फे अनोख्या उपक्रमाचे आयोजन
BOI
Friday, May 10, 2019 | 03:33 PM
15 0 0
Share this article:


पुणे : हास्य विनोद करणारा चार्ली, विदूषक, घोडे, उंट, मिकी माउस, बँड-बाजा... आणि आनंदाने हसणारी, गलबलाट करणारी मुले ... हे दृश्य होते मामाच्या गावाची सफर या उपक्रमातील. यात सहभागी झालेल्या विविध संस्थांमधील मुलांचे जंगी स्वागत करण्यात आले. 

या वेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सुर्यवंशी, खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, नगरसेवक हेमंत रासने, श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अॅ्ड. शिवराज कदम जहागिरदार, अभिनेत्री ॠतुजा जुन्नरकर, शिरीष मोहिते, अॅड. शिरीष शिंदे, आनंद सराफ, डॉ. मिलिंद भोई, कुमार रेणुसे, राजाभाऊ कदम, सागर पवार, सागर घम आदी मान्यवरही उपस्थित होते. 


याबाबत अधिक माहिती देताना सेवा मित्रमंडळाचे शिरीष मोहिते म्हणाले, ‘आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील वंचित मुलांना सुटीत मामाच्या गावी जाऊन राहण्याचा आनंद घेता यावा, यासाठी गेली वीस वर्षे शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्टतर्फे या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. यंदाही बुधवारी, आठ मे रोजी या उपक्रमाची सुरुवात झाली. पुण्यातील वंचित-विकास, बचपन वर्ल्ड फोरम, एकलव्य न्यास, संतुलन, अहमदनगरमधील आदिवासी पारधी समाज विकास संस्था, फुलवा, श्रीवत्स इत्यादी संस्थांमधील मुले यात सहभागी झाली आहेत. तीन दिवस शुक्रवार पेठेत असलेल्या एका शाळेत त्यांचा मुक्काम आहे. अनेक मान्यवर या मुलांच्या भेटीसाठी आले होते. जंगी स्वागत समारंभ झाल्यानंतर या मुलांनी बारशाच्या सोहळ्यात सहभाग घेतला. मामाच्या गावी, आजोळी आल्यावर जशी सगळी मुले मजा करतात, त्यांचे कोडकौतुक केले जाते, तसाच अनुभव ही मुले घेतात. त्यांना सध्या गाजत असलेला ‘अॅव्हेंजर-एंड ऑफ द गेम’ हा चित्रपट दाखवण्यात आला. समाजप्रबोधन करणाऱ्या विषयावर फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आली. अग्निशमन दलाची प्रात्यक्षिके, खडक पोलीस स्टेशनला भेट अशा कार्यक्रमांचही आयोजन त्यांच्यासाठी करण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी प्रथमेश रिसॉर्ट येथे मुलांची सहल काढण्यात आली असून, संध्याकाळी शालेय साहित्य, कपडे देऊन त्यांची पाठवणी करण्यात येईल.’  

‘या मुलांच्या चेहऱ्यावर फुलणारे हसू, आनंद आमच्यासाठी लाख मोलाचा आहे. परिस्थितीमुळे या सुटीत मामाच्या गावी जाण्याच्या आनंदाला वंचित राहणाऱ्या मुलांच्या आयुष्यात हा आनंद भरता यावा या उद्देशाने आम्ही हा उपक्रम राबवत आहोत. अनेक संस्था, मान्यवर व्यक्ती  यात सहभागी होतात. समाजातूनही या उपक्रमाचे कौतुक होते, ही खूप समाधानाची बाब आहे. जास्तीतजास्त मुलांना हा आनंद देता यावा असा आमचा प्रयत्न आहे,’ असेही मोहिते यांनी सांगितले.   
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search