Next
‘एडियू’तर्फे मुलांसाठी ‘मेक युवर मूव्ही’ स्पर्धा
प्रेस रिलीज
Thursday, May 17 | 03:29 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘एडियू’ (Edyoo.com) या शाळकरी मुलांच्या पालकांसाठीच्या लर्निंग, एज्युकेशन आणि विकास उत्पादने आणि सेवांसाठीच्या ऑनलाइन बाजारपेठेकडून ‘वकाव’च्या (Vkaao) साह्याने पीव्हीआर किड्स या डे-आउट फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन १९ मे ते १० जून २०१८ या कालावधीत ११ शहरांमध्ये करण्यात आले आहे. यामध्ये बंगळुरू, मुंबई, एनसीआर, हैदराबाद आणि इतर अनेक मोठ्या महानगरांचा समावेश आहे.

या फेस्टिव्हलच्या पार्श्‍वभूमीवर ‘एडियू’मध्ये मुलांची मेक युअर मूव्ही स्पर्धा हा एक नाविन्यपूर्ण प्रवर्ग आणला आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून देशभरातील मुलांना आपले चित्रपट निर्मितीचे टॅलेंट दाखवता येणार आहे. यासाठी आपला फोन किंवा व्यावसायिक व्हिडिओ कॅमेऱ्याद्वारे हा चित्रपट बनवता येणार आहे.

ही स्पर्धा १३ वर्षांपेक्षा कमी, १३-१५ वर्षे आणि १६-१८ वर्षे या सर्व वयोगटातील मुलांसाठी खुली आहे. प्रत्येक फिल्मचा कालावधी १-५ मिनिटे असावा. इंग्लिश, हिंदी, कन्नड, मराठी, तेलुगू, तामिळ आदींचा समावेश असलेल्या इतर प्रादेशिक भाषांमधील प्रवेशिका स्वीकारण्यात येणार आहेत. चित्रपट बनवण्यासाठी मुलांना ३-४ जणांचा समूह करता येणार आहे.

‘एडियू’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहसंस्थापक रक्षित केजरीवाल, ग्रेड्स डोंट मॅटरचे संस्थापक वरुण अग्रवाल आणि इतर काही मान्यवर असलेल्या विशेष परीक्षक मंडळाकडून प्रवेशिका तपासून विजेत्यांची निवड करण्यात येणार आहे. परीक्षक मंडळाकडून ‘पटकथा लेखन आणि चित्रपट निर्मितीबाबत टिप्स’ या विषयावर एक धमाल व्हिडिओ शूट करण्यात येणार आहे आणि त्याद्वारे मुलांना आपली कला अचूक करण्यासाठी मदत केली जाईल. या परीक्षक मंडळाकडून फेस्टिव्हलच्या एक आठवडा आधी विजेत्यांची घोषणा करून आणि निवडलेल्या चित्रपटांचे प्रदर्शन ‘Edyoo.com’च्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर करण्यात येईल. प्रत्येक वर्गातील विजेते चित्रपट या फेस्टिव्हलदरम्यान पीव्हीआर थिएटर्सवर दाखवण्यात येतील.

पीव्हीआर सिनेमाजचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौतम दत्त म्हणाले, ‘सिनेमा हा भारतातील कौटुंबिक मनोरंजनाचा वाढता स्त्रोत आहे आणि पीव्हीआरच्या तारुण्यपूर्ण प्रेक्षकांमध्ये मुले हा एक सातत्यपूर्ण घटक आहेत. एक खास सिनेमा फॉर्मेट तयार करण्याबरोबरच, पीव्हीआर प्लेहाऊस हे मुलांनी मुलांसाठी तयार केलेले स्वप्नातील जग आहे आणि त्याद्वारे आम्ही या महत्त्वाच्या प्रेक्षकवर्गासाठी आमची ऑफरिंग कस्टमाइज करत आहोत. किड्स डे आउटचे उद्दिष्ट उन्हाळ्याच्या सुट्टीचा फायदा घेण्याचे आहे जेव्हा मुले मोकळी असतात आणि मुलांचे चित्रपट आणि धमाल उपक्रम यांच्यासोबत चित्रपटाच्या जादूचा अनुभव घेण्यासाठी तयार असतात. ‘पीव्हीआर’ची ‘एडियू’सोबतची भागीदारी मुलांमध्ये निश्चितच कलात्मकतेला चालना देईल आणि मोठ्या पडद्यावर त्यांचे टॅलेंट दाखवण्यासाठी एक व्यासपीठ देईल.

विजेती टीम चिल्ड्रेन्स ज्युरीचा भाग होणार असून, ते देशभरात आयोजित करण्यात येणार्‍या स्पेशल ज्युरींसोबत व्यासपीठांवर येतील. याचबरोबर चिल्ड्रेन्स ज्युरींमधून फेस्टिव्हलच्या दिवशी दाखवण्यात येणार्‍या चित्रपटाची निवड केली जाणार असून, आणि त्यांचे चित्रपट पीव्हीआर थिएटर्समध्येही दाखवण्यात येणार आहेत.

या उपक्रमाबाबत बोलताना रक्षित केजरीवाल म्हणाले, ‘मुले हे आपले भवितव्य आहेत आणि प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन देणारा एक प्रिझम आहेत. तुम्ही त्यांच्यासोबत जितके जास्त काम कराल तितके तुम्हाला त्यांचे मुक्त विचार आणि कलात्मकता दिसेल. या स्पर्धेसारख्या स्पर्धेमुळे त्यांना प्रौढ समाजात आपला दृष्टिकोन देणे आणि दृश्यांच्या माध्यमातून आपले विचार व्यक्त करणे शक्य होईल.’

स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी : www.kdoff.com
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link