Next
‘फोर्ड’ची भारतीय रस्ते सुरक्षा मोहिमसोबत भागीदारी
प्रेस रिलीज
Saturday, April 28 | 02:22 PM
15 0 0
Share this story

पुणे : सुरक्षित आणि सभ्य वाहनचलनाला प्रोत्साहन देण्याच्या आपल्या मोहिमेंतर्गत पादचाऱ्यांच्या सुरक्षेबाबतची उदासिनता, पदपथावरून गाड्यांची वाहतूक, रस्त्यांवर वाढणारी भांडणे तसेच, वाहन चालवताना लक्ष दुसरीकडे देण्याची चुकीची वृत्ती या समस्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी फोर्ड इंडिया कंपनीने भारतीय रस्ते सुरक्षा मोहिम (आयआरएससी) सोबत भागीदारी केली आहे.

‘फोर्ड #cartesy’ या मूळ मोहिमेंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या जागरुकता मोहिमेचे नेतृत्व ‘आयआरएससी’चे प्रतिनिधी करीत असून, रस्ते सुरक्षा सप्ताहादरम्यान पाच हजारांहून अधिक विद्यार्थी व त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचण्याचे मोहिमेचे ध्येय आहे. 

चित्रकला व प्रश्नमंजूषा स्पर्धांसोबतच, ‘फोर्ड’चा पॅरेंट सेफ्टी रिपोर्ट कार्ड हा आगळावेगळा उत्साहपूर्ण उपक्रम राबवण्यात येणार आहे. या रिपोर्ट कार्डाच्या म्हणजेच पालकांसाठीच्या प्रगतीपुस्तकाच्या माध्यमातून वाहतूकीच्या नियमांचा अवलंब करण्याच्या निकषांवर प्रत्येक विद्यार्थी आपल्या पालकांना मूल्यांकन देणार आहे. यात सुरक्षा पट्यांचा वापर, झेब्रा क्रोसिंगच्या आधीच गाडी थांबवणे आदी निकष लावण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी पालकांना गुण दिल्यानंतर, ते आपल्या पालकांशी शेअर करण्याची संधीही विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून, पाल्यांच्या नजरेतून पालकांचे वाहनचलन कसे आहे, ते किती विवेकी वर्तन राखतात आणि वाहतुकीचे नियम कितपत कळतात, हे समजू शकणार आहे.

‘फोर्ड’ गाड्यांमध्ये सर्वोत्कृष्ट सुरक्षा तंत्रज्ञान पुरवण्यापासून ‘#cartesy’ या मोहिमेच्या माध्यमातून तरुण चालकांमध्ये सभ्यता रुजवण्यापर्यंतच्या सर्वच उपामांद्वारे प्रत्येक कुटुंब रस्ते वाहतूक सुरक्षितरित्या करू शकेल, याची काळजी आम्ही घेत असल्याचे फोर्ड इंडियाच्या विपणन विभागाचे उपाध्यक्ष राहुल गौतम म्हणाले.

२०१७मध्ये फोर्ड इंडियाने कर्टसी ही मोहीम सादर केली. दैनंदिन जीवनात रस्त्यावर प्रवास करते वेळी सभ्यतेने व इतरांचा मान राखून वागण्यासाठी या मोहिमेद्वारे चालकांना प्रोत्साहन देण्यात आले. आयआयटी- डीच्या विद्यार्थी व माजी विद्यार्थ्यांनी रस्ते सुरक्षा या विषयाला वाहिलेल्या आयआरएससी या सर्वांत मोठ्या संस्थेशी भागीदारी करून आपल्या रस्त्यांना असुरक्षित बनवणाऱ्या सर्वच समस्यांबाबत जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न ‘फोर्ड’ करते आहे.

२०२०पर्यंत भारतात रस्त्यांवर होणाऱ्या अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत ५० टक्के घट करण्याच्या उद्देशाने भारतीय रस्त्यांना सुरक्षित बनवण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेऊन सुरू केलेली आयआरएससी (सॉल्व्ह) ही सर्वांत मोठी संस्था आहे. ही संस्था सध्या ५०हून अधिक शहरांत कार्यरत असून, एका हजार ७०० हून अधिक कार्यकर्ते या संस्थेसाठी काम करतात. भारतातल्या १० राज्यांतील एक कोटींहून अधिक लोकांवर आजवर या संस्थेने प्रभाव टाकला आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link