Next
‘गर्जे मराठी’ पुस्तक प्रकाशन सोहळा एक ऑगस्टला मुंबईत
प्रेस रिलीज
Saturday, July 28, 2018 | 03:52 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : ‘गर्जे मराठी’ या पुस्तकाच्या पहिल्या भागाची मराठी आवृत्ती आणि इंग्रजीतील दुसऱ्या भागाचे प्रकाशन एक ऑगस्ट २०१८ रोजी संध्याकाळी सहा वाजता प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिरात पर्सिस्टंट सिस्टीम्सचे संस्थापक अध्यक्ष डॉ. आनंद देशपांडे आणि त्रिपुराचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे.

‘गर्जे मराठी’ भाग दोन या इंग्रजी पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीचे प्रोफेसर डॉ. श्याम नवाथे, विश्वामित्र रिसर्च इन्स्टिट्यूटच्या संस्थापक डॉ. ऊर्मिला दिवेकर, अॅकॅडमी अॅवॉर्ड विजेते संगणकशास्त्र संशोधक डॉ. पराग हवालदार, अपाचे हडूप सॉफ्टवेअरचे मुख्य रचनाकार डॉ. मिलिंद भांडारकर, काळे लॉजिस्टिक्सचे सहसंस्थापक नरेंद्र काळे, सिंटेल कंपनीचे सहअध्यक्ष प्रशांत रानडे, ‘येल सेंटर ऑफ जीनोम अॅनालिसिस’चे संचालक डॉ. श्रीकांत माने, बर्मिंगहॅम युनिव्हर्सिटीच्या ‘स्कूल ऑफ बायोसायन्सेस’च्या डॉ. अदिती कान्हेरे, ‘आयटीसी इन्फोटेक’च्या बिझनेस डेव्हलपमेंट विभागाचे संचालक अजित रानडे, एचआर स्ट्रॅटेजिस्ट अॅडव्हायझर प्रज्ञा पुणेकर आणि बेर्ग श्मीडट मलेशियन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक हर्षवर्धन भावे उपस्थित राहणार आहेत. यांच्या कथा या पुस्तकात वाचायला मिळणार आहेत.

परदेशात ठसा उमटविलेल्या अनिवासी मराठी भारतीयांच्या कथा ‘गर्जे मराठी’ या पुस्तकात आनंद गानू आणि सुनीता गानू यांनी शब्दबद्ध केल्या आहेत. या पुस्तकाचा इंग्रजीतील पहिला भाग गेल्या वर्षी प्रकाशित करण्यात आला होता. त्याचा मराठी अनुवाद आणि इंग्रजी पुस्तकाचा दुसरा भाग आता प्रकाशित करण्यात येणार आहे. ग्रंथाली प्रकाशनातर्फे ही पुस्तके प्रकाशित होत आहेत. या कार्यक्रमाला रसिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन, ग्रंथाली प्रकाशनाचे विश्वस्त धनंजय गांगल आणि सुदेश हिंगलासपूरकर, तसेच या उपक्रमाच्या संयोजक धनश्री धारप यांनी केले आहे. 
‘गर्जे मराठी’ भाग एक या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद मेधा आलकरी, जी. बी. देशमुख, स्वाती मराठे, चित्रा वाघ आणि सुचिता देशपांडे यांनी केला आहे. या मूळ इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन गेल्या वर्षी एक ऑगस्ट रोजी पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते झाले होते. आता आनंद आणि सुनीता गानू यांनी या पुस्तकाचा दुसरा भाग लिहिला असून, त्यात मराठी भाषिकांची मान जगात ताठ करणाऱ्या नामवंतांची कर्तृत्वगाथा लिहिली आहे. विविध क्षेत्रांत आपल्या कर्त्वात्त्वाने तळपणाऱ्या महाराष्ट्रीय प्रतिभेचा प्रतीकात्मक आविष्कार म्हणजे ‘गर्जे मराठी’ हे पुस्तक आहे. 

प्रकाशनानिमित्त ही तिन्ही पुस्तके कार्यक्रमस्थळी सवलतीच्या दरात उपलब्ध होणार आहेत. गर्जे मराठी भाग एक (इंग्रजी) हे १२५० रुपये मूळ किंमतीचे पुस्तक सवलतीत ६०० रुपयांना, मराठी भाग एक गर्जे (मराठी) हे ६५० रुपयांचे पुस्तक ३५० रुपयांना, तर गर्जे मराठी भाग दोन (इंग्रजी) हे मूळ एक हजार रुपयांचे पुस्तक सवलतीत ६०० रुपयांना मिळणार आहे. 

कार्यक्रमाविषयी :
‘गर्जे मराठी’ पुस्तक प्रकाशन सोहळा

स्थळ : रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, मुंबई

वेळ : एक ऑगस्ट, संध्याकाळी सहा वाजता.

(‘गर्जे मराठी’ या पुस्तकाचा पहिला इंग्रजी भाग ‘बुकगंगा डॉट कॉम’वर उपलब्ध आहे. तो घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search