Next
धीराचे धनवान बना
BOI
Thursday, October 26 | 12:27 PM
15 0 0
Share this story

धीर किंवा संयम हा गुण अंगी बाणवला, तर आपल्या आयुष्यात आश्चर्यकारक बदल घडू शकतो; पण हा गुण आपल्यात नसेल तर? तरी चालेल. कारण तो प्रयत्नाने आत्मसात करता येतो. कसा? ते सरश्री लिखित या पुस्तकातून समजते.

एखादी गोष्ट हवी असेल, तर उतावीळ होऊ नका, धीर धरा, शांत राहा, प्रयत्नाने ती मिळेलच यावर विश्वास ठेवा, असे संतुलीत जीवन जगणे ही एक कला आहे. संयम राखण्याची कला आहे. संयम राखण्याची कला अवगत करण्याची गुरुकिल्लीही पुस्तकातून मिळते. निरंतर अभ्यास हा सर्वात मोठा संगीतकार आहे, हेही समजावून देतात.

धीर धरण्यात अडचणी आल्या, तर त्यावर मात कशी करायची, संयम वाढविण्याच्या पद्धती कोणत्या आदी माहितीही मिळते.    

प्रकाशक : तेजग्यान ग्लोबल फाऊंडेशन
पाने : १७६
किंमत : १२५ रुपये  
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link