Next
‘भाजप’ उत्तर भारतीय मोर्चाच्या सुराज्य रथ यात्रेला प्रारंभ
प्रेस रिलीज
Wednesday, October 31 | 12:25 PM
15 0 0
Share this story



मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) केंद्रातील आणि राज्यातील सरकारांच्या मागील चार वर्षांच्या दैदीप्यमान कामगिरीची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या ‘भाजप’ उत्तर भारतीय मार्चाच्या वतीने काढण्यात येणाऱ्या सुराज्य रथ यात्रेचा प्रारंभ करण्यात आला. ही रथ यात्रा २९ ऑक्टोबर ते एक नोव्हेंबर २०१८ अशी चार दिवस चालेल.

‘भाजप’ महाराष्ट्र प्रदेशच्या नरीमन पॉइंट येथील कार्यालयातून २९ ऑक्टोबर २०१८ महिला बालकल्याण राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी सुराज्य रथ यात्रेला हिरवा झेंडा दाखवला. या वेळी महारास्त्र ‘भाजप’ उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष जयप्रकाश ठाकूर, उत्तर भारतीय मोर्चाचे ज्येष्ठ नेते आर. डी. यादव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

सुराज्य रथयात्रेद्वारे केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारच्या गेल्या चार वर्षांतील विविध लोक कल्याणकारी योजनांची व कामगिरीची माहिती देण्यात येणार आहे. २९ ऑक्टोबर ते एक नोव्हेंबर या  कालावधीत ही सुराज्य रथयात्रा मुंबई, पिंपरी-चिंचवड, अहमदनगर, औरंगाबाद, अकोला, जळगाव, धुळे, नाशिक, डहाणू, नालासोपारा या शहरांतून जाणार आहे. या प्रत्येक शहरात जाहीर सभा घेण्यात येणार आहेत. नालासोपारा येथे या रथयात्रेची सांगता होणार आहे.

अध्यक्ष ठाकूर आणि ज्येष्ठ नेते यादव, मोर्चाचे सरचिटणीस प्रद्युम्न शुक्ला, नितीशकुमार वर्मा, जे. पी. सिंग, रघुवीर सिंग, चिराग गुप्ता, कैलास वर्मा, शैलेश मिश्रा, राज वर्मा, अर्जुन गुप्ता, व उत्तर भारतीय मोर्चाचे अनेक कार्यकर्ते या चार दिवसांच्या रथ यात्रेत सहभागी झाले आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link