Next
‘खेळाडूंना सपोर्ट सिस्टीम मिळणे आवश्यक’
ज्येष्ठ क्रिकेटपटू चंदू बोर्डे यांची अपेक्षा
BOI
Friday, November 23, 2018 | 04:34 PM
15 0 0
Share this story

मुरलीकांत पेठकर यांना चंदू बोर्डे यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी श्रीकांत बडवे, सुप्रिया बडवे आदी.

पुणे : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आपल्या खेळाडूंना चांगल्या सुविधा पुरविल्या, चांगले मानधन मिळवून दिले, उत्तम प्रशिक्षक तयार केले, त्यामुळेच भारतीय संघ क्रिकेट विश्वात आपले महत्वाचे स्थान निर्माण करू शकला. ज्याप्रमाणे बीसीसीआयने आपल्या खेळाडूंना सर्वतोपरी पाठबळ दिले, तशीच ‘सपोर्ट सिस्टीम’ स्थानिक खेळाडूंनादेखील मिळाली तर, नक्कीच भारतीय खेळाडू प्रत्येक खेळात भारताचे नाव उंचावतील’, अशी अपेक्षा भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार व बीसीसीआयचे माजी अध्यक्ष चंदू बोर्डे यांनी व्यक्त केली.

गुरुबन्स कौर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करताना (डावीकडून) पोलीस महानिरीक्षक विठ्ठलराव जाधव, श्रीकांत बडवे, सुप्रिया बडवे, चंदू बोर्डे व विजय संतान.

‘स्पोर्ट्सइंडी’च्या वतीने बालशिक्षण सभागृह येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी गुरुबन्स कौर, मुरलीकांत पेठकर, शांताराम जाधव यांना बोर्डे यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कारागृह महानिरीक्षक विठ्ठलराव जाधव, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान, स्पोर्ट्सइंडीच्या संचालिका सुप्रिया बडवे, बडवे इंजिनियारिंगचे श्रीकांत बडवे, स्पोर्ट्सइंडीचे समन्वयक श्रीपाद जवळेकर, जितेंद्र जोशी आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.
संपदा बुचडे यांना क्रीडा पुरस्कार प्रदान करताना श्रीकांत बडवे, सुप्रिया बडवे, विठ्ठलराव जाधव, चंदू बोर्डे व विजय संतान.

क्रीडापटू रोहन मोरे, शीतल महाजन, साक्षी महाले, जोसेफ डिसुझा, दत्तू भोकनळ, रणजीत नलावडे, आकांक्षा हागवणे, वेदांगी कुलकर्णी व संपदा बुचडे यांनाही या वेळी  स्पोर्ट्सइंडी क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या वेळी बोलताना कारागृह महानिरीक्षक विठ्ठलराव जाधव म्हणाले, ‘हार-जीत हा खेळातला अविभाज्य घटक आहे. यामुळे खेळाडू पराभवदेखील पचवायला शिकतो. खेळाच्या माध्यमातून समाज पराभव पचवायला शिकला तर कायदा-सुव्यवस्थेवर कधीच ताण पडणार नाही.’

आकांक्षा हगवणे यांना क्रीडा पुरस्कार प्रदान करताना श्रीकांत बडवे, सुप्रिया बडवे, विठ्ठलराव जाधव, चंदू बोर्डे व विजय संतान.

स्पोर्ट्सइंडीच्या संचालिका सुप्रिया बडवे म्हणाल्या, ‘क्रीडा संस्कृतीचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने आम्ही प्रयत्नशील आहोत. नव्या दमाच्या खेळाडूंना चांगले व्यासपीठ मिळावे, या उद्देशानेच स्पोर्ट्सइंडीची स्थापना करण्यात आली आहे.’

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिरुद्ध दडके यांनी, कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुप्रिया बडवे यांनी, तर श्रीकांत बडवे यांनी आभार मानले.   
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link