Next
‘राज्यात चार ठिकाणी अद्ययावत कर्करोग उपचार सुविधा’
वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांची माहिती
प्रेस रिलीज
Wednesday, June 26, 2019 | 02:19 PM
15 0 0
Share this article:

गिरीश महाजनमुंबई : ‘राज्यात मुंबईतील टाटा कॅन्सर रिसर्च सेंटर बरोबरच औरंगाबाद, नागपूर आणि चंद्रपूर येथे कर्करोग रुग्णांना आता चार ठिकाणी उपचार घेता येतील. त्यासाठी अद्ययावत सुविधा उभारण्यात येत आहेत,’ अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.

नागपूर येथील कर्करोग रुग्णालयाचे बांधकाम सुरू करण्यासंबंधी सदस्य गिरीशचंद्र व्यास यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना महाजन बोलत होते.

ते महाजन म्हणाले, ‘नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात कर्करोग उपचार सोयी सुविधांसाठी ७६. कोटींहून अधिक रकमेच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली आहे. नागपूर सुधार प्रन्यास प्राधिकरणामार्फत बांधकामाची प्रक्रिया करण्यात येणार आहे. नागपूर येथे १५० खाटा, तर चंद्रपूर आणि औरंगाबाद येथे प्रत्येकी १०० खाटा असलेले कर्करोग उपचार केंद्र असणार आहे. जळगाव येथेही याच धर्तीवर कर्करोग उपचार केंद्र सुरू व्हावे, अशी मागणी केंद्र शासनाकडे केली आहे.’ 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search