Next
लोटस इंग्लिश स्कूलला देशी-विदेशी अधिकाऱ्यांची भेट
BOI
Monday, September 09, 2019 | 02:13 PM
15 0 0
Share this article:



सोलापूर :
कासेगाव (ता. पंढरपूर) येथील ‘श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन’द्वारे संचलित लोटस इंग्लिश स्कूलमध्ये देशी-विदेशी कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुकतीच भेट दिली. त्यात जपानमधील टोकियो येथील टोपान प्रिंटिंग कंपनीचे डायरेक्टर कजिरो ओकी, अनुराग गुप्ता, नवी दिल्लीच्या एआरजी कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेडचे रविकांत वैरागडे, यारोकी ट्रेनिंग स्पेशालिस्ट अनुपमा नेरूरकर, यारोकी एज्युकेशन कौन्सेलर श्वेता आंबेकर, यारोकी सीनियर ट्रेनर अनिकेत जगदाळे यांचा समावेश होता.

स्वाइप तथा श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन आणि यारोकी यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक या वेळी झाली. यातून ‘यारोकी’ या सॉफ्टवेअरने गणित विषय आणखी सोप्या पद्धतीने कसा शिकवता येऊ शकेल, यावर सखोल चर्चा झाली. टॅबद्वारे गणित शिकल्यामुळे विद्यार्थ्यांना कसा उपयोग होतो, याबाबतही जाणून घेण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांना अनेक प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांनी त्यांची उत्तरे दिली. तसेच विद्यार्थ्यांनी विचारलेल्या शंकांचे यारोकीच्या अधिकाऱ्यांनी निरसन केले. विद्यार्थ्यांच्या मनातील गणित विषयाची भीती आणखी कशा प्रकारे कमी करता येईल, यावरदेखील चर्चा झाली.



या वेळी संस्थेचे विश्वस्त सूरज रोंगे यांच्या हस्ते सर्व पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे सचिव डॉ बी. पी. रोंगे, अध्यक्ष बी. डी. रोंगे, खजिनदार दादासाहेब रोंगे, स्कूलचे कमिटी चेअरमन डॉ. सुधाकर पडवळ, विश्वस्त सूरज रोंगे यांच्यासह प्राचार्य डॉ. जयश्री चव्हाण, शिक्षक हृदयनाथ नामदे, समीर मुलाणी, मयूर वागज, संपत लवटे, सुदर्शन कुंभार, शिक्षिका रेश्मा कोकणे, प्रियंका जरे, आस्मा शेख, सुप्रिया अंकुशराव आदी उपस्थित होते. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search