Next
‘मोन्जिन’तर्फे स्मार्ट स्टोव्हचे वाटप
प्रेस रिलीज
Saturday, July 14, 2018 | 01:56 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘मोन्जिन’ एचआर टेक (स्टार्ट अप) कंपनीने खारखर्डी येथील रहिवाशांना शाश्वत आणि धूरमुक्त आयुष्य जगण्यासाठी ८५ घरांत स्मार्ट स्टोव्हचे वाटप केले आहे. ‘एन्व्हिरोफिट’च्या सहकार्याने ‘मोन्जिन’ने अरण्या फणसाड फार्म्स येथे नुकतेच या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या वेळी ‘मोन्जिन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित कश्यपे, नेतृत्व संघाचे सदस्य कर्णधार अवनीश ढाल उपस्थित होते. समाजाचा विकास साधण्याचे आणि पर्यावरण शाश्वततेचा प्रसार करण्याच्या मूल्यांवर आधारलेल्या या कंपनीने खारखर्डीमधील रहिवाशांचे जीवनमान सुधारण्याचे ध्येय ठेवले आहे.

या प्रसंगी ‘मोन्जिन इंटरव्ह्यूज’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह संस्थापक कश्यपे म्हणाले, ‘सामाजिक आणि पर्यावरणदृष्ट्या जागरूक कंपनी बनण्यासाठी आम्ही बांधील आहोत आणि हा उपक्रम हे त्या दिशेने आम्ही टाकलेले पहिले पाऊल आहे. ‘एनव्हिरोफिट’बरोबर केलेल्या सहकार्यामुळे खारखर्डीमधील रहिवाशांना निरोगी जीवन जगायला मदत होईल. ६० उत्साही ‘मोन्जिनीयर्स’च्या मदतीने आम्ही गावकऱ्यांच्या सोबतीने शाश्वत पर्यावरण तयार करत वसुंधरेच्या हितासाठी योगदान दिले.’

मोन्जिनच्या सर्व कर्मचाऱ्यांनी नेतृत्व संघासह जवळच्या गावात ३५ रोपांची लागवडी केली. इंधनाची गरज पूर्ण करण्यासाठी खारखर्डीमधील गावकरी झाडे तोडत असल्याचे लक्षात आल्यानंतर या उपक्रमाची संकल्पना समोर आली. काही जणांनी ती झाडे इतक्या वर्षांत मुद्दाम लावली होती व त्यामागे ओसाड जमिनीचे सदाहरित जंगलात रूपांतर करण्याचे उद्दिष्ट होते. त्या व्यतिरिक्त स्वयंपाक करताना लाकूड जाळल्यामुळे बाहेर पडणारा धूर केवळ मानवासाठी नाही, तर पर्यावरणासाठी अतिशय धोकादायक असतो. ‘एनव्हिरोफिट’च्या मते खुल्या आगीमुळे दरवर्षी एक अब्ज कार्बन डायऑक्साइड तयार होते, ज्याचा जागतिक काळा कार्बन उत्सर्जनातील वाटा २५ टक्के आहे.

‘एनव्हिरोफिट’चे व्यवस्थापकीय संचालक हरीश अंचन म्हणाले, ‘मोन्जिनबरोबर त्यांच्या पहिल्या सीएसआर कार्यक्रमासाठी सहकार्य करताना आम्हाला आनंद होत असून, हरित भविष्याची निर्मिती करण्यासाठी मदत करण्याची व या प्रक्रियेदरम्यान सामाजिक आयुष्य बदलण्याची त्यांची तयारी यांमुळे आम्हाला प्रोत्साहन मिळाले आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link