Next
‘सीजीपीएल’ला ‘फेम एक्‍सलन्‍स सेफ्टी अॅवॉर्ड’
प्रेस रिलीज
Tuesday, August 07 | 01:47 PM
15 0 0
Share this story

मुंबई : कोस्‍टल गुजरात पॉवर लिमिटेड (सीजीपीएल) या भारताची सर्वात मोठी एकीकृत वीज कंपनी टाटा पॉवरच्‍या उपकंपनीला सर्वोत्तम सुरक्षा पद्धती आणि कामाच्‍या ठिकाणी सुरक्षितताविषयक नियमांची अंमलबजावणी करण्‍यासाठी फेम एक्‍सलन्‍स सेफ्टी अॅवॉर्डने (गोल्‍डसह) सन्‍मानित करण्‍यात आले. डेहरादूनमध्‍ये नुकत्याच आयोजित केलेल्‍या एका समारोहामध्‍ये ‘सीजीपीएल’च्‍या अग्निशमन व सुरक्षा विभागाचे प्रमुख प्रमोद कुमार सिंग यांनी कंपनीतर्फे पुरस्‍कार स्‍वीकारला.

उत्‍तराखंडचे शहरी विकास मंत्री मदन कौशिक, अर्थमंत्री प्रकाश पंत, उत्‍तराखंड भारतीय जनता पक्षाचे राज्‍य महासचिव नरेश बंसल आणि माजी खासदार जे. पी. अग्रवाल यांच्‍या हस्‍ते पुरस्‍कार प्रदान करण्‍यात आला.

पुरस्‍कार विजेत्‍या टीमचे अभिनंदन करत टाटा पॉवरचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी व कार्यकारी संचालक अशोक सेठी म्‍हणाले, ‘आरोग्‍य व सुरक्षा हे आमच्‍यासाठी अत्‍यंत महत्त्वाचे क्षेत्र असण्‍यासोबतच आमच्‍या व्‍यवसायाचा महत्त्वपूर्ण भाग आहेत. आम्‍ही सातत्‍याने कामाच्‍या ठिकाणी सर्वोत्तम व्‍यावसायिक आरोग्‍य व सुरक्षा आणण्‍याचा प्रयत्‍न करतो. हा पुरस्‍कार निश्चितच या दिशेने करत असलेल्‍या आमच्‍या प्रयत्‍नांना चालना देईल.’

फाउंडेशन फॉर अॅक्‍सेलेरेटेड मास एम्‍पॉवरमेंट (फेम) यांच्‍याकडून मिळालेला हा पुरस्‍कार क्षेत्रांना सर्वोत्‍तम व्‍यावसायिक आरोग्‍य व सुरक्षा प्रणाली, प्रक्रिया व पद्धतींची अंमलबजावणी करण्‍यासाठी सन्‍मानित करतो.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link