Next
यशापेक्षा जास्त मिळाले अपयश : महेश भट्ट
BOI
Tuesday, February 05, 2019 | 06:25 PM
15 0 0
Share this article:

महेश भट्टमुंबई : प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते महेश भट्ट यांनी नुकताच आपल्या मुली अभिनेत्री पूजा भट्ट आणि आलिया भट्ट यांच्यासोबत आगामी ‘सडक २’ हा चित्रपट करणार असल्याचे जाहीर केले होते. त्या धर्तीवर चित्रपट क्षेत्रातील त्यांच्या अनेक अनुभवांचे त्यांनी कथन केले. चित्रपट कारकीर्दीत यशापेक्षा अपयशाचा सामना अधिक करावा लागल्याचे ते सांगतात. 

‘चित्रपट हा पैश्याने नाही तर लोकांनी बनत असतो आणि चित्रपटाचे सर्वांत जवळचे नाते असते ते लोकांच्या मनाशी’, हे ठामपणे सांगत महेश भट्ट यांनी आपल्यासाठी चित्रपट म्हणजे काय, याची नेमकी व्याख्या केली. ‘चित्रपट बनवताना लोकांशी चर्चा करण्यापेक्षा अनेकदा एकट्यात जाऊन बसावे लागते आणि चित्रपटाच्या कथेबाबत विचार करावा लागतो. १९८२मध्ये आलेला माझा चित्रपट ‘अर्थ’ ची कहानी अशीच आहे. हा चित्रपट बनवत असताना लोकांनी हा चित्रपट चालणार नाही असे मला सांगितले होते. या चित्रपटाच्या आधीचे चार चित्रपट फ्लॉप गेले असताना मी हा चित्रपट करत होतो, अशा वेळेस जास्त भीती होती, मात्र मी इतर गोष्टींपेक्षा चित्रपटाच्या कथेवर जास्त लक्ष दिले आणि त्या चित्रपटाने इतिहास रचला. असे अनेक किस्से घडले असले, तरी यशापेक्षा अपयशाचाच मला जास्त सामना करावा लागला’, असे त्यांनी सांगितले. 

दरम्यान १९९१मध्ये आलेल्या ‘सडक’ या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा काही दिवसांपूर्वी महेश भट्ट यांनी केली होती. या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट आणि आदित्य रॉय कपूर हे दोघे प्रमुख भूमिकेत असून, ते पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. याशिवाय ‘सडक’ या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसलेले पूजा भट्ट आणि अभिनेता संजय दत्त हेदेखील ‘सडक २’मध्ये तब्बल २७ वर्षांनंतर एकत्र दिसणार आहेत. २० वर्षानंतर महेश भट्ट दिग्दर्शनात पुन्हा पाऊल ठेवत आहेत. मार्च २०२०मध्ये ‘सडक २’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.  
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search