Next
हिमायतनगरमध्ये आमदार चषक क्रिकेट स्पर्धा
नागेश शिंदे
Saturday, October 13, 2018 | 04:12 PM
15 0 0
Share this story

हिमायतनगर (नांदेड) : येथे शिवतेज क्रिकेट क्लब प्रस्तुत ‘आमदार चषक २०१८’तर्फे भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला २१ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून, स्पर्धेचे उद्घाटन आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या हस्ते केले जाणार आहे.

शहरातील दवणे पेट्रोलपंपाजवळील शंकर पाटील यांच्या मैदानावर ही स्पर्धा होईल. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ नेते लक्ष्मणराव शक्करगे, नगराध्यक्ष कुणाल राठोड, उपनगराध्यक्ष मो. जावेद, पोलीस उपअधीक्षक अभय देशपांडे, टायगर ग्रुपचे जिल्हाध्यक्ष बाळूभाऊ जाधव, परमेश्वर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, शिवसेना तालुकाप्रमुख तथा नगरसेवक रामभाऊ ठाकरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गजानन तुप्तेवार, नगरसेवक अनवर खान पठाण, प्रभाकर अण्णा मुधोळकर, सदाशिव सातव, पोलीस निरीक्षक रवींद्र बोरसे, ज्येष्ठ शिवसैनिक विठ्ठल ठाकरे, जनसेवक सरदार खान पठाण, नगरसेवक सावन डाके, विनायक मेंडके, प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हाप्रमुख बालाजी बलपेलवाड, श्री. खयूम आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या स्पर्धेचे पहिले बक्षीस ५१ हजार १११ रुपये युवासेना जिल्हाप्रमुख कृष्णा पाटील आष्टीकर यांच्याकडून जाहीर करण्यात आले आहे. दुसरे बक्षीस ३१ हजार १११ रुपये नगराध्यक्ष कुणाल राठोड व उपनगराध्यक्ष मो. जावेद यांनी संयुक्तपणे जाहीर केले आहे. तिसरे बक्षीस ज्येष्ठ शिवसैनिक विठ्ठल ठाकरे यांच्या कडून ११ हजार १११ रुपये देण्यात येणार आहेत.

या स्पर्धेत जास्तीत जास्त संघांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन क्रिकेट कमिटीचे अध्यक्ष शुभम संगणवार, शुभम दंडेवाड, सोनू चिठेवाड, विशाल काळे, विशाल बदेवाड, विष्णू वानखेडे, किशोर मानपुरे, मंगेश शिंदे, आकाश वानखेडे, हनुमान अरेपल्लू, शुभम हरडपकर, शंकर जाधव यांनी केले आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link