Next
‘गोवर रुबेला लसीकरणाची प्रभावी जनजागृती करावी’
BOI
Thursday, October 11 | 04:31 PM
15 0 0
Share this story

पंढरपूर : ‘आरोग्य विभागाने गोवर रुबेला लसीकरण मोहिमेची प्रभावी जनजागृती करावी. मोहिमेच्या यशस्वीतेसाठी सामाजिक संस्था व खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी सहकार्य करावे,’ असे आवाहन तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी येथे केले.

येथील पंचायत समितीच्या शेतकी सभागृहात टास्क र्फोस समितीची बैठकीत २७ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या गोबर रुबेला लसीकरण मोहिमेची माहिती देण्यात आली. बैठकीस पंचायत समिती सभापती राजेंद्र पाटील, गट विकास अधिकारी रवीकिरण घोडके, जागतिक आरोग्य संघटनेच्या डॉ. ज्योती लांडगे, तालुका वैद्यकीय अधिकारी एकनाथ बोधले यांच्यासह शिक्षण विभाग, आरोग्य विभागाचे अधिकारी, सामाजिक संस्था व खाजगी वैद्यकीय व्यावसायिक उपस्थित होते.

बर्गे म्हणाले, ‘पंढरपूर तालुक्यात लसीकरण मोहीम यशस्वी होण्यासाठी प्रत्येक शाळेत पालक-शिक्षक संवाद मेळावा घ्यावा. लसीकरणाबाबत सर्वांना माहिती होण्यासाठी समाजातील मान्यवर व्यक्ती, बालरोग तज्ज्ञ यांचे ऑडिओ, व्हिडिओ क्लिप तयार करून ते सोशल मीडियावर प्रसिद्ध कराव्यात. पोलिओ लसीकरण मोहिम यशस्वीपणे राबविली त्याचप्रमाणे गोबर रुबेला लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबवून गोबर रुबेलाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत.’

सर्व शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र त्याचबरोबर विविध सामाजिक ठिकाणी हे अभियान राबविण्यात येणार आहे. नऊ महिने ते पंधरा वर्षे वयोगटातील मुला-मुलींना ही लस दिली जाणार आहे. त्यासाठी शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, महिला बालकल्याण विभागाने मोहीम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेच्या डॉ. लांडगे, तालुका वैद्यकीय अधिकारी बोधले यांनी गोबर रुबेला लसीकरण मोहिमेबाबत माहिती दिली. या वेळी तालुक्यातील राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रम, राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय कीटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link