Next
‘अल्लाना’च्या बीफार्म अभ्यासक्रमास अधिस्वीकृती
प्रेस रिलीज
Tuesday, October 10 | 05:39 PM
15 0 0
Share this story

पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी संचलित अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसीच्या बीफार्म अभ्यासक्रमास ‘नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रीडिटेशन’ (नवी दिल्ली) यांच्याकडून अधिस्वीकृती (अॅक्रीडिटेशन) मिळाली आहे. ही अधिस्वीकृती तीन वर्षांसाठी आहे.

यानिमित्त आझम कॅम्पस येथे कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आय.पी.ए. कम्युनिटी फार्मसी डिव्हिजनचे अध्यक्ष डॉ. एम. डी. बुरांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. हा कार्यक्रम डॉ. ए. आर. शेख असेम्ब्ली हॉल मध्ये झाला.

एमसीई सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी डॉ. प्रवीण चौधरी, डॉ. सोहन चितलांगे, डॉ. साधना शाही हे मान्यवर उपस्थित होते.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण भिसे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. दिलनवाझ पठाण यांनी आभार मानले. या वेळी  विद्यार्थी, प्राध्यापक, पालक उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link