Next
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण
BOI
Monday, February 18, 2019 | 03:26 PM
15 0 0
Share this article:

पुणे : येथील ‘एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे’ आणि ‘एमआयटी एडीटी विद्यापीठ, राजबाग, पुणे’ यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचा अनावरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मंगळवारी (१९ फेब्रुवारी) शिवजयंतीच्या दिवशी लोणी काळभोर येथील ‘विश्वराजबाग’ या जगातील सर्वांत मोठ्या घुमटाच्या परिसरात हा कार्यक्रम होणार आहे. 

‘विश्वराजबाग’ या परिसरात दुपारी चार वाजून १५ मिनिटांनी या अनावरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानपरिषदेचे अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर हे असतील. 

या वेळी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले, कोल्हापूरचे खासदार छत्रपती संभाजी राजे, खासदार शिवीजीराव आढळराव पाटील, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, सिक्किमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले व आमदार बाबूराव पाचर्णे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search