Next
ठाणे महापालिका मुख्यालयात भारतातील पहिले स्मार्ट टॉयलेट
BOI
Tuesday, June 25, 2019 | 11:54 AM
15 0 0
Share this article:


ठाणे : महानगरपालिकेच्या मुख्यालयात देशातील पहिले  स्मार्ट टॉयलेट कार्यान्वित करण्यात आले असून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात ठाणे महापालिकेने एक पाऊल पुढे टाकले आहे. महानगरपालिका मुख्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या प्रमुख उपस्थितीत या टॉयलेटचे उद्घाटन करण्यात आले. 

यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. स्वयंचलित स्वच्छता प्रणाली (self cleaning system), साबण, पाण्याचा योग्य वापर, ऑटोमॅटिक लाइट्स, वीज आणि पाण्याची बचत, जैवविघटनशील प्लास्टिक आसन कव्हर आदी बाबींचा यात समावेश आहे. स्मार्ट टॉयलेट बांधण्यासाठी नगरसेवक पूर्वेश प्रताप सरनाईक यांनी पुढाकार घेऊन तत्कालीन मुख्य शहर अभियंता अनिल पाटील व विद्यमान मुख्य शहर अभियंता खडताळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प पूर्ण केला.

मुख्यालय दुरुस्ती विभागाचे महेश बोराडे यांनी यासाठी सहकार्य केले. ठाण्यातील कौस्तुभ धोंडे व अभिषेक शिंदे या दोन तरुणांनी विविध तंत्रांचा उपयोग करून भारतामध्ये प्रथमच अशा प्रकारचे स्मार्ट टॉयलेट तयार केले असून, ठाणे महापालिकेने ते कार्यान्वित केले आहे.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search