Next
शिवाजी विद्यापीठात ‘इलेक्ट्रॉनिक बाईक’ची निर्मिती
तंत्रज्ञान विभागाच्या विद्यार्थ्यांचा यशस्वी प्रकल्प
BOI
Saturday, May 11, 2019 | 01:51 PM
15 0 0
Share this article:

‘इलेक्ट्रॉनिक बाईक’ची निर्मिती करणारे शिवाजी विद्यापीठातील तंत्रज्ञान विभागाचे विदयार्थी ओंकार पोखरकर, क्षितिज लालसरे आणि अनुजा मोहिते आणि मार्गदर्शक शिक्षक वर्ग.

कोल्हापूर : पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दरांमुळे बेजार झालेल्या वाहनधारकांना दिलासा देणारा उपाय शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागातील विद्यार्थांनी शोधला आहे. त्यांनी बॅटरीवर चालणाऱ्या ‘इलेक्ट्रॉनिक बाईक’ची निर्मिती केली असून, त्यामुळे इंधनाच्या खर्चात लक्षणीय बचत करण्याबरोबरच वाहनांमुळे होणारे वायू प्रदूषण रोखणेही शक्य झाले आहे.

शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागातील बी. टेक. इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीच्या अंतिम वर्षातील विदयार्थी ओंकार पोखरकर, क्षितिज लालसरे आणि अनुजा मोहिते यांनी बॅटरीवर चालणाऱ्या या ‘इलेक्ट्रॉनिक बाईक’ची निर्मिती केली आहे. ही मोटारसायकल तयार करण्यासाठी बॅटरी वगळता फक्त चौदा हजार रुपये इतका खर्च आला आहे. तीन तास चार्ज केल्यानंतर ही गाडी अंदाजे ६५ किलोमीटर धावते. ताशी ५० किलोमीटर वेगाने ती धावू शकते.
 
या मोटरसायकलमध्ये स्पीडोमीटर, इंडिकेटर, हॉर्न, ब्रेक अशा सर्व  सुविधा आहेत. ही गाडी विद्यार्थ्यांनी दैनंदिन कामकाजासाठी वापरली असून, १०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतर पार केले आहे. ही गाडी चालवताना नेहमीचे वाहन चालवल्यासारखाच अनुभव येत असल्याचे त्यांनी सांगितले.

या गाडीच्या डिझाइनसाठी या प्रकल्पाचे मार्गदर्शक आणि विभागाचे समन्वयक डॉ. शामकुमार चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. जयदीप बागी यांचे प्रोत्साहन मिळाले. या प्रकल्पासाठी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांचे बहुमोल मार्गदर्शन; तसेच प्रकुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के व कुलसचिव डॉ. व्ही. डी. नांदवडेकर यांचेही प्रोत्साहन लाभले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 154 Days ago
It might be a good idea to take out a patent . That would help marketing easy and safe . Wish you luck .
0
0

Select Language
Share Link
 
Search