Next
धाडसी सिद्दरामेश्वर हुमानाबादे याचा दिल्लीत सत्कार
आगीतून वाचवले दहाजणांचे प्राण
BOI
Wednesday, January 02, 2019 | 04:01 PM
15 0 0
Share this story

स्वतःचा जीव धोक्यात घालून, १० जणांचे प्राण वाचवणाऱ्या मुंबईच्या  सिद्दरामेश्वर हुमानाबादे याचा सत्कार करताना केंद्रीय कामगार व रोजगार कल्याण राज्यमंत्री संतोष गंगवार.

नवी दिल्ली : मुंबईच्या अंधेरी भागातील ईएसआयसी रुग्णालयात लागलेल्या आगीत स्वतःचा जीव धोक्यात घालून १० जणांचे प्राण वाचवणाऱ्या मुंबई येथील सिद्दरामेश्वर हुमानाबादे याचा केंद्रीय कामगार व रोजगार कल्याण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) संतोष गंगवार यांनी एक लाख रुपयांचे पारितोषिक देऊन गौरव केला.

केंद्रीय कामगार व रोजगार कल्याण मंत्रालयांतर्गत कार्यरत मुंबई येथील अंधेरी परिसरातील राज्य कर्मचारी विमा मंडळाच्या (ईएसआयसी) रूग्णालयात १७ डिसेंबर २०१८ रोजी अचानक आग लागली. आगीने रौद्र रूप धारण केले, या वेळी  समयसूचकता दाखवत, फूड डिलिव्हरी बॉय, सिद्दरामेश्वर हुमानाबादे याने स्वतःचा जीव धोक्यात घालून, आगीत सापडलेल्या दहा लोकांचे प्राण वाचवले. त्याच्या या साहसी कार्याची दखल घेत केंद्रीय राज्यमंत्री गंगवार यांनी केंद्रीय कामगार व रोजगार कल्याण मंत्रालयात हुमानाबादे याला एक लाखाचे पारितोषिक देऊन गौरव केला.

या वेळी  गंगवार म्हणाले, ‘मुंबईतील रूग्णालयात लागलेल्या आगीत जीवाची तमा न बाळगता सिद्देरामेश्वर हुमानाबादे याने अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्याचे केलेले साहसी कार्य कौतुकास्पद आहे. आगीतील दूषित वायूने श्वास घेण्यास अडचणही झाली, तरीही त्याने पीडितांना वाचविण्यासाठी निकराचे प्रयत्न सुरू ठेवले. ईएसआयसी रूग्णालयाचे कर्मचारी नसतानाही आगीत सापडलेल्या लोकांचे प्राण वाचवून हुमानाबादे याने दाखवलेले साहस आणि निरपेक्ष सेवाभाव हा संपूर्ण देशवासियांसाठी आदर्श आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link