Next
पुणे येथे ‘एमफाइन ऑन डिमांड हेल्थकेअर सर्व्हिस’
प्रेस रिलीज
Tuesday, April 02, 2019 | 04:35 PM
15 0 0
Share this article:

पुणे : एआय पॉवर्ड ‘एमफाइन’ या ऑन डिमांड हेल्थकेअर सर्व्हिसला व्हर्च्युअल मेडिकल कन्सल्टेशन्समध्ये मजबूत करून सध्या पुणे येथे उपलब्ध करण्यात आले आहे. ‘एमफाइन’ने शहरातील १० प्रमुख हॉस्पिटल्ससह भागीदारी केली असून, यामध्ये मदरहूड, क्लाउडनाइन, ऑयस्टर आणि पर्ल, श्री हॉस्पिटल आणि संचेती हॉस्पिटल यांचा समावेश आहे.

‘एमफाइन’ हे ग्राहकांचे आरोग्य सहकारी असून, त्यांना कोणत्याही वेळी आणि कुठेही कन्सल्टेशन्ससाठी मजबूत करते. पुण्यातील ग्राहकांचा प्रवेश वाढविण्यासाठी ‘एमफाइन’ने २०१९मध्ये १०० हॉस्पिटल्स आणि ५००हून अधिक डॉक्टरांची नोंद करण्याची योजना आखली आहे.

‘एमफाइन’चे एमहेल्थ सोल्यूशन हे युजरला व्हर्च्युअली आणि जेव्हा गरज असते तेव्हा डॉक्टरांकडून कन्सल्टेशन्स घेण्यास सक्षम करते. या कन्सल्टेशन्समध्ये संपूर्ण डायग्नोसिस आणि वैध डिजिटल प्रिस्क्रिप्शनचा समावेश आहे. युजर यामध्ये स्वतःचे आणि संपूर्ण कुटुंबाचे हेल्थ रेकॉर्ड सुरक्षितपणे संग्रहित करू शकतात; तसेच चॅट, व्हिडिओ, इमेजेस, डाक्यूमेंट्सद्वारे विविध आरोग्याच्या मापदंडांचा मागोवा घेऊ शकतो. ‘एमफाइन’चे युजर हे व्हायरल इन्फेक्शन्ससारख्या आजारांवर नव्हे, तर क्रॉनिक डिसीज, डायबिटीज आणि आर्थराइटिस यांसारख्या दीर्घकालीन आजारांवरदेखील कन्सल्टेशन्स घेऊ शकतील.

यामध्ये रुग्णांना कार्डिओलॉजी, ऑर्थोपेडिक्स आणि फर्टिलिटी यांसारख्या आजारांवर सुपर स्पेशॅलिटीजचे कन्सल्टेशन्स घेता येईल; तसेच लवकर व्हॅटल्सचे निरीक्षण, लॅब टेस्टसाठी नमुना गोळा करणे आणि घरी औषध वितरण करणे यांसारख्या अतिरिक्त सर्व्हिस सुरू करण्यात येतील. युजरला गरजेनुसार क्रॉनिक कंडिशन्स, निरोगी जीवनशैली राखण्यासाठी आणि पुनर्प्राप्तीची मदत करण्यासाठी अनेक डिजिटल साधने पाइपलाइनमध्ये आहेत.

‘एमफाइन’मध्ये एआय-पॉवर्ड डायग्नोसिस इंजिन असून, ते डॉक्टरांना त्यांची कार्यक्षमता आणि परिणामकारकता सुधारण्याकरिता मदत करते. एआय सिस्टीम डॉक्टरांना रुग्णांची माहिती गोळा करण्यास मदत करते आणि डॉक्टरांसाठी योग्य निदान आणि उपचार योजना सूचित करते. यामुळे त्यांना अधिक रुग्णांवर कार्यक्षम आणि प्रभावीपणे उपचार करण्यास सक्षम बनवते; तसेच डीप मेडिकल प्रोटोकॉलसह अल्गोरिथम एम्बेड मशीन डॉक्टरांना उच्च दर्जाचे आणि मोठ्या प्रमाणात केअर कन्सल्टेशन्स वितरीत करण्यात मदत करते.

आपल्या प्लॅटफॉर्मवर अग्रगण्य आणि विश्वासार्ह हॉस्पिटल आणि वैयक्तिक डॉक्टरांसह भागीदारी करून त्यांना एकत्रित  करून एक अद्वितीय मॉडेल ‘एमफाइन’ने सादर केले आहे. देशात प्रथमच हॉस्पिटलसाठी ‘एमफाइन’ने त्यांचे नवीन केंद्र सुरु केले असून  जे अधिक रुग्णांना  प्रीमियम सेवा,लॉन्ग टर्म केअर प्रोग्राम, कोणत्याही खासगी गुंतवणूकीशिवाय सुपर स्पेशलिटीज सर्व्हिस ऑफर करत आहे. भारतातील गुणवत्तापूर्ण प्राथमिक आणि माध्यमिक देखभाल सुलभ करून तृतीयांश टाळता यावा हा ‘एमफाइन’चा दृष्टिकोन आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search