Next
स्पर्धा परीक्षेतून निवड झालेल्या प्रथमेश किनरे, प्रथमेश फोडकर यांचा सत्कार
रत्नागिरीतील अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा अकादमीचे विद्यार्थी
BOI
Monday, November 26, 2018 | 05:17 PM
15 0 0
Share this article:

प्रथमेश फोडकर व प्रथमेश किनरे यांचा सत्कार करताना सतीश शेवडे व प्राची जोशी. शेजारी मंदार गाडगीळ, आनंद देसाई, किरण धांडोरे व मनाली साळवी.

रत्नागिरी :
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण अकादमीच्या प्रथमेश किनरे याची सारस्वत बँकेत ज्युनिअर ऑफिसर म्हणून आणि प्रथमेश फोडकर याची नगरपरिषद लेखापाल/लेखापरीक्षक या पदासाठी निवड झाली. याबद्दल कार्यवाह सतीश शेवडे, नियामक मंडळ सदस्य अॅड. प्राची जोशी यांच्या हस्ते २६ नोव्हेंबर २०१८ रोजी त्यांचा सत्कार करण्यात आला.

प्रथमेश किनरे याने ‘आयबीपीएस’च्या धर्तीवर सारस्वत बँकेच्या परीक्षेत यश मिळवले. ३०० पदांच्या भरतीमध्ये जिल्ह्यातून पात्र ठरलेला प्रथमेश हा एकमेव उमेदवार ठरला. पदवीचे शिक्षण घेऊन तो अरुअप्पा जोशी अकादमीत बँकिंग, इन्शुरन्सच्या परीक्षांचे मार्गदर्शन घेत होता. अकादमीतील मार्गदर्शन, संदर्भ ग्रंथ, अभ्यासिका, सराव चाचण्या व ऑनलाइन टेस्टमुळे हे यश मिळाल्याचे त्याने सांगितले. प्रथमेश आता वाशी येथे प्रशिक्षणासाठी रवाना झाला असून, पुढील महिन्यात तो नोकरीवर रुजू होणार आहे.

लेखापाल/लेखापरीक्षक या पदासाठी प्रथमेश फोडकरची निवड झाली. ४२१ पदे भरली जाणार होती आणि त्यासाठी राज्यातून हजारो उमेदवार बसले होते; मात्र रत्नागिरी जिल्ह्यातून प्रथमेश एकमेव पात्र ठरला. महापोर्टल या ऑनलाइन यंत्रणेद्वारे भरती झाली. ऑनलाइन व बहुपर्यायी स्वरूपाची पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा अशा प्रकारच्या दोन टप्प्यांत परीक्षा झाली. प्रथमेशने गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात वाणिज्य शाखेतून पदवी संपादन केली आहे. त्यानंतर दोन वर्षे त्याने नोकरी केली. नंतर अरुअप्पा जोशी अकादमीची माहिती मिळाल्यावर तिथून स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन घेतले. ‘एमपीएससी’च्या लिपिक, उत्पादनशुल्क विभागाच्या मुख्य परीक्षाही त्याने दिल्या. 

या दोघांची निवड झाल्याबद्दल नियामक मंडळ सदस्य सीए मंदार गाडगीळ, आनंद देसाई, अकादमीचे प्रभारी समन्वयक व गोगटे-जोगळेकर कॉलेजचे ग्रंथपाल किरण धांडोरे, अकादमीच्या ग्रंथपाल मनाली साळवी, समन्वयक इंदुमती मलुष्टे यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search