Next
भिवंडी लेबर फ्रंटने दिला अपंग व्यक्तीला मदतीचा हात
BOI
Friday, March 01, 2019 | 04:54 PM
15 0 0
Share this article:



भिवंडी : कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी सदैव प्रयत्नशील असलेल्या लेबर फ्रंट युनियनतर्फे शहरातील एका अपंग व्यक्तीला तीन चाकी सायकल भेट देऊन मदतीचा हात दिला. लेबर फ्रंटच्या या सामाजिक कार्यामुळे अपंग व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंद उमटला.

इस्लामपुराचे रहिवासी असलेले निसार अन्सारी हे अपंग असून त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे ते शहरात भिक्षा मागून आपली गुजराण करतात. शारीरिक अपंगत्वामुळे त्यांना रस्त्यावरून जाताना त्रास होत होता. लेबर फ्रंटच्या सभासदांनी या गोष्टीची दखल घेत २८ फेब्रुवारी २०१९ रोजी निसार यांना तीन चाकी सायकल भेट देऊन आर्थिक मदत केली.

या प्रसंगी लेबर फ्रंटचे सरचिटणीस संतोष चव्हाण, उपाध्यक्ष एल. पी. गायकवाड, विजय जाधव, सल्लागार डॉ. सुनील भालेराव, सचिव रवींद्र गायकवाड, प्रसिद्धी प्रमुख संदीप गायकवाड, नीलेश जाधव, तुषाल शेलार, अनिल जाधव, विघ्नेश मसुना, प्रकल्प अधिकारी कैलास पाटील यांच्यासह लेबर फ्रंटचे सभासद उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना लेबर फ्रंटचे सरचिटणीस संतोष चव्हाण म्हणाले, ‘लेबर फ्रंट युनियन कामगारांच्या न्याय हक्काबरोबरच सामाजिक बांधिलकी नेहमीच जोपासत आली आहे. त्याच जाणीवेने आज निसार अन्सारी या अपंग व्यक्तीस सायकल व आर्थिक मदत दिली आहे भविष्यात त्याला अपंग व्यक्तींसाठी असलेल्या शासनाच्या सोयीसुविधा व निधी देण्यासाठीदेखील लेबर फ्रंट सदैव तत्पर राहील.’

‘लेबर फ्रंटने माझ्यासारख्या अपंग व्यक्तींबद्दल दाखवलेल्या सामाजिक बांधिलकीमुळे मला खऱ्या अर्थाने वेग मिळाला असून, भविष्यात आपण एखादा व्यवसाय करून स्वतःचा उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करू,’ अशी प्रतिक्रिया व्यक्त करून निसार यांनी लेबर फ्रंटचे आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search