Next
काळेकरडे स्ट्रोक्स
BOI
Tuesday, November 20, 2018 | 10:00 AM
15 0 0
Share this story

मध्यमवर्गीय कुटुंबातील कॉलेजला जाणाऱ्या युवकाच्या जीवनात अनेक मित्र-मैत्रिणी येत असतात. अशा वेळी घरची ओढ कमी होत जाते आणि बाहेरच मन गुंतते; पण हे गुंतणे कधी कधी अपूर्ण राहते आणि जीवन कोरडेपणाने पुढे चालू राहते.

प्रणव सखदेव यांच्या ‘काळेकरडे स्ट्रोक्स’मधील समीरच्या कॉलेज आयुष्यातही सानिका व चैतन्य येतात. गर्भश्रीमंत सानिका आणि अंध चैतन्य एकमेकांवर प्रेम करीत असतात. म्हणूनच चैतन्यचे अपघाती निधन झाल्यानंतर ती समीरच्या रूपात त्याला पाहते. पुढे समीरच्या आयुष्यात सलोनी येते. ‘हिपिटायटीस बी’चा व्हायरस तिच्या शरीरात असतो. समीरच्या साथीने तिचे जीवन फुलते, रोगाचा धोका कमी होतो. याचकाळात समीर सानिकाचा शोध घेत मुळशीला पोचतो. तिथे तिच्या मृत्यूने मुळापासून हलतो. हिमाचल प्रदेशात तडकाफडकी निघून गेलेला समीर दादूकाकामुळे पुन्हा माणसात येतो; मात्र तोपर्यंत सालोनीही दूरदेशी गेलेली असते. फिल्म बनविण्याचे त्याचे स्वप्न प्रत्यक्षात येते, तरी मनात एक उदास पोकळीचे ओझे बाळगूनच तो जीवन जगात राहतो.
       
प्रकाशन : रोहन प्रकाशन
पृष्ठे : २१९
मूल्य : २५० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link