Next
लहुजी शक्ती सेनेची मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा
प्रेस रिलीज
Wednesday, March 13, 2019 | 02:32 PM
15 0 0
Share this story



मुंबई : लहुजी शक्ती सेनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची १२ मार्च २०१९ रोजी मुंबईत भेट घेतली व विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे व प्रदेशाध्यक्ष सोमनाथ कांबळे यांनी समाधान व्यक्त केले.

भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या पुढाकाराने ही भेट झाली. लहुजी शक्ती सेनेने मातंग समाजाच्या विविध मागण्या मांडल्या. फडणवीस यांनी प्रत्येक मागणीची दखल घेऊन सकारात्मक चर्चा केली. या वेळी लहुजी शक्ती सेनेचे कैलासभाऊ खंदारे, अमोल चव्हाण, सचिन क्षीरसागर, सनी साळवे व हनुमंत ताकतोडे उपस्थित होते.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link