Next
हिमायतनगरमध्ये ‘तहेजीब’तर्फे सामुदायिक विवाह सोहळा
नागेश शिंदे
Monday, April 29, 2019 | 03:30 PM
15 0 0
Share this article:


हिमायतनगर : शहरात तहेजीब फाउंडेशनतर्फे २८ एप्रिल २०१९ रोजी सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात २४ जोडपी विवाहबद्ध झाली. तहेजीब फाउंडेशनच्या वतीने गेल्या १३ वर्षांपासून सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला जात आहे.

गेल्या दोन वर्षांपासून तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असून, या परिस्थितीत लग्नसमारंभ ही खर्चिक व न परवडणारी बाब होऊन बसली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य लोकांना सामुदायिक विवाह सोहळ्याचा मोठा आधार वाटतो. या वर्षी फाउंडेशनने २४ जोडप्यांचा सामूहिक विवाह थाटात लावून दिला. विवाहित जोडप्यांना फाउंडेशनतर्फे संसारोपयोगी साहित्य देण्यात आले. 


हा मेळावा यशस्वी करण्यासाठी अ.वाहिद सेठ, मजहर मौलाना, उपनगराध्यक्ष मो. जावेद, रफिकसेठ, नगरसेवक फिरोज खान यांनी प्रयत्न केले. दुष्काळी परिस्थितीमध्ये सामुदायिक विवाह मेळाव्याचे आयोजन करणे गरजेचे असल्याचे अ. वाहिद सेठ यांनी या वेळी सांगितले. 

नवविवाहित जोडप्यांना आशीर्वाद देण्यासाठी अ.वाहिद सेठ, मजहर मौलाना, उपनगराध्यक्ष मो.जावेदसेठ, रफीकसेठ, नगरसेवक फिरोज खान मो.अमेर, खुदुस मौलाना, शब्बीर भाई, तमजिद सेठ, बाकि सेठ, अब्दुलाभाई, सय्यद मनान, शेख आदिल, शेख इब्राइम, खलील मौलाना, फहाद खान पठान, नवीद सेठ, अजीजभाई यांच्यासह असंख्य कार्यकर्ते  या वेळी उपस्थित होते.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search