Next
सावित्रीच्या लेकीला दिले डॉ. दुधभाते नेत्रालयाने अर्थसाह्य
BOI
Saturday, July 27, 2019 | 05:10 PM
15 0 0
Share this article:

पुणे : सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या डॉ. दुधभाते नेत्रालयाने वडगाव बुद्रुक येथील इयत्ता बारावीमध्ये वाणिज्य शाखेत ८४.६१ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या राधा कोकरे हिला शैक्षणिक मदत म्हणून अर्थसाह्य करून खारीचा वाटा उचलला. 

राधा कोकरे ही विद्यार्थिनी हुशार असूनही केवळ घरची परिस्थिती हलाखीची असल्याने तिला तिच्या आवडीच्या एअरलाईन्स क्षेत्रात करिअर करणे शक्य नव्हते. याची माहिती मिळताच डॉ. अनिल दुधभाते यांनी तिला तिच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला. मोलमजुरी करणारे राधाचे वडिल धनाजी कोकरे यांच्याकडे नुकताच हा मदत निधी सुपुर्द करण्यात आला. या वेळी संदीप मोरे, अरुणा जोशी, विनया कुलकर्णी, प्राची जोशी आदी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search