Next
‘कोमसाप’तर्फे वाङ्मय पुरस्कारांसाठी आवाहन
BOI
Sunday, August 12, 2018 | 10:00 AM
15 0 0
Share this story

रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे (कोमसाप) कोकणातील सभासद साहित्यिकांना दरवर्षी वाङ्मयीन पुरस्कार दिले जातात. डिसेंबर २०१८मध्ये दिल्या जाणार्‍या वाङ्मयीन पुरस्कारासाठी कोकणातील साहित्यिकांकडून पुस्तके मागविण्यात येत आहेत. हे सर्व पुरस्कार ‘कोमसाप’चे कोकणातील सभासद असणार्‍या लेखकांसाठी आहेत.

प्रथम श्रेणीचे सात पुरस्कार प्रत्येकी पाच हजार रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र आहेत. कादंबरी, कथा, कविता, समिक्षा, ललित गद्य, चरित्र-आत्मचरित्र, चित्रपटविषयक पुस्तकांसाठी हे पुरस्कार दिले जातील. र. वा. दिघे कादंबरी पुरस्कार, वि. सी. गुर्जर कथासंग्रह पुरस्कार, आरती प्रभू कवितासंग्रह पुरस्कार, अनंत काणेकर ललित गद्य पुरस्कार, प्रभाकर पाध्ये समीक्षा पुरस्कार, धनंजय कीर चरित्र पुरस्कार, भाई भगत चित्रपट, नाट्यविषयक पुरस्काराचा समावेश आहे. सौ. लक्ष्मीबाई व न्यायमूर्ती राजाभाऊ गवांदे ललित गद्य पुरस्कारासाठी गोवा, कारवार, बेळगाव या प्रदेशातील लेखकांचाही विचार केला जाईल.

विशेष पुरस्कार प्रत्येकी तीन हजार रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे सात पुरस्कार असून, त्यामध्ये कादंबरी, कथा, कविता, बालवाङ्मय, संकीर्ण गद्य, नाटक-एकांकिका, वैचारिक पुस्तकांचा समावेश आहे. यात वि. वा. हडप कादंबरी पुरस्कार, विद्याधर भागवत कथासंग्रह पुरस्कार, वसंत सावंत कवितासंग्रह पुरस्कार, श्रीकांत शेट्ये चरित्र, आत्मचरित्र पुरस्कार, प्र. श्री. नेरुरकर बालवाङ्मय पुरस्कार, वि. कृ. नेरुरकर संकीर्ण वाङ्मय पुरस्कार, अरुण आठल्ये वाङ्मय संकीर्ण पुरस्कार, रमेश कीर नाटक, एकांकिका पुरस्कार, वैचारिक साहित्यासाठी फादर स्टीफन सुवार्ता वसई पुरस्कार यांचा समावेश आहे.


पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवणारे लेखक, कवी ‘कोमसाप’च्या कार्यक्षेत्रातील (सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे, मुंबई, नवी मुंबई) असावा; तसेच तो ‘कोमसाप’चा आजीव सभासद असणे आवश्यक आहे. तशा प्रकारचे ‘कोमसाप’ जिल्हा अध्यक्ष अथवा शाखाध्यक्षांचे प्रमाणपत्र किंवा सभासद पावतीची छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.

पुस्तकाचा वाङ्मय प्रकाराचा स्पष्ट निर्देश (कथा, कादंबरी, कविता, ललित वाङ्मय) लेखकाने पुरस्कारासोबत करायचा आहे. ही पुस्तके एक एप्रिल २०१५ ते ३१ मार्च मार्च २०१८ या कालावधीत प्रसिद्ध झालेली असावीत. या आधी पाठविलेली पुस्तके पुन्हा पाठविण्याची आवश्यकता नाही. मुदत असेपर्यंत वा मुदत संपेपर्यंत एकदा पाठविलेले पुस्तक पुरस्कारासाठी पुन्हा विचारात घेतले जाईल. पुरस्कारासाठी पुस्तकाच्या दोन प्रती ३० सप्टेंबर २०१८ पूर्वी पाठवाव्यात.

पुस्तकाच्या प्रती पाठविण्यासाठी पत्ता : पुरस्कार समिती प्रमुख, प्रा. अशोक रा. ठाकूर द्वारा सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे व्यवस्थापन पालघर, ता. जि. पालघर ४०१ ४०४.
नियम व अटींचे माहितीपत्रक मागविण्यासाठी ई-मेल : ashokthakur46@gmail.com
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link