Next
‘बीएनपी परिबास इंडिया कंझम्पशन फंड’ची नोंदणी सुरू
प्रेस रिलीज
Saturday, August 18, 2018 | 05:23 PM
15 0 0
Share this article:

‘बीएनपी परिबास इंडिया कंझम्पशन फंड’बाबत माहिती देताना आनंद शहा
मुंबई : ‘बीएनपी परिबास अॅसेट मॅनेजमेंट इंडिया प्रा. लि.’ ने ‘बीएनपी परिबास इंडिया कंझम्पशन फंड’ ही नवीन फंड ऑफर (एनएफओ) जाहीर केली आहे. त्याची नोंदणी १७ ऑगस्टपासून सुरू झाली असून, ती ३१ ऑगस्टपर्यंत चालू राहणार आहे. हा एक ओपन एंडेड इक्विटी फंड आहे. 
 
या फंडाबाबत मॅनेजिंग डायरेक्टर व सीईओ शरद शर्मा म्हणाले, ‘भारत ही एक मोठी आणि वाढती ग्राहक बाजारपेठ असून, त्याच्या महसूल विभागात एक अब्ज ग्राहकांचे पाठबळ आहे. कुटुंबाचे वाढते उत्पन्न, शहरीकरण, छोटी कुटुंबे ही त्याची प्रमुख कारणे आहेत. मागील दशकाच्या तुलनेत सध्या व्यक्तिगत उपभोग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या बदलामुळे ग्राहकांच्या गरजा पूर्ण करणाऱ्या कंपन्यांना त्याचा फायदा होणे अपेक्षित आहे.’ 

‘बीएनपी परिबास अॅसेट मॅनेजमेंट इंडिया प्रा. लि. ही ‘बीएनपी परिबास अॅसेट मॅनेजमेंट’ची भारतातील उपकंपनी आहे. भारतीय ग्राहकांच्या वाढत्या (उत्पादने आणि सेवा) गरजांमुळे कंपन्यांना फायदा होणे अपेक्षित आहे, अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून भांडवल वृद्धी निर्माण करणे आणि दीर्घकालीन वाढीच्या संधी उपलब्ध करणे हा या फंडाचा हेतू आहे.  या योजनेच्या माध्यमातून वाहन, बँका, सिमेंट, बांधकाम, गॅस वितरण, आरोग्यसेवा, हॉटेल्स, माध्यमे आणि करमणूक, कीटकनाशके, औषधे, किरकोळ वितरण, दूरसंचार सेवा, वस्त्रोद्योग अशा विविध क्षेत्रात गुंतवणूक केली जाईल’, असेही त्यांनी सांगितले.  

‘व्यवसाय ते ग्राहक’ असे मॉडेल वापरणाऱ्या, तसेच मजबूत प्रतिस्पर्धी असणाऱ्या आणि बाजार भांडवल क्षेत्रामधील कंपन्या शोधण्याचा आमचा हेतू आहे’, अशी माहिती ‘बीएनपी परिबास ऍसेट मॅनेजमेंट इंडिया प्रा. लि.’चे  उप मुख्य कार्यकारी अधिकारी व गुंतवणूक विभागाचे प्रमुख आनंद शहा यांनी दिली.  
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search