Next
पुण्यात ‘डेक्‍कन लिटरेचर फेस्टिव्हल’ला प्रारंभ
BOI
Saturday, January 12, 2019 | 01:47 PM
15 0 0
Share this article:

पुणे : दकनी अदब फाउंडेशनने आयोजित केलेल्या ‘डेक्‍कन लिटरेचर फेस्टिव्हल’ च्या माध्यमातून संगीत, साहित्य आणि मुशायरा एकाच मंचावर ऐकण्याची सुवर्णसंधी पुणेकरांना उपलब्ध झाली आहे.

शनिवार,१२ आणि रविवार,१३ जानेवारी रोजी बीएमसीसी महाविद्यालयाजवळील श्री महावीर जैन विद्यालयात हा महोत्सव होत असून, यात उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांच्यापासून नव्या पिढीतील गायक, साहित्यिक आणि कवी यांना ऐकता येणार आहे.

‘अभिनेत्री दिप्ती नवल, साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांच्यासह गुलाम मुस्तफा खान, शीन काफ निजाम, मनोज मुंतशीर यांसह अनेक दिग्गज कवी, साहित्यिक, शायर यात सहभागी होणार आहेत. अप्रकाशित पु. ल. देशपांडे, केशवसूत, पु. शि. रेगे यांच्यावरही विशेष कार्यक्रम होणार असून, ‘शब्दांची रत्ने’ या कार्यक्रमात साहित्यिकांबरोबर चर्चा करता येणार आहे.  ‘पंछी ऐसे आते है’ हे नाट्य, कवितांची मैफल याचबरोबर शास्त्रीय आणि सुफी संगीताचाही आस्वाद घेता येणार आहे,’ अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक जयराम कुलकर्णी यांनी दिली.

‘पुण्यात संगीत, साहित्याचा चाहता वर्ग मोठा आहे. त्यांना एकाच ठिकाणी संगीत, शायरी आणि साहित्यिक चर्चेची मेजवानी देण्याचा प्रयत्न याद्वारे केला आहे. जुन्या आणि नव्या पिढीतील कलाकार आणि मराठी, हिंदी, उर्दू या तीन भाषांचा मिलाफ हे याचे वैशिष्ट्य आहे. यंदा महोत्सवाचे हे पहिलेच वर्ष आहे. यापुढे दर वर्षी असा महोत्सव भरविण्याचा विचार आहे,’ असेही त्यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search