Next
काशीबाई नवले कॉलेजमध्ये राज्यस्तरीय चर्चासत्र उत्साहात
प्रेस रिलीज
Monday, February 18, 2019 | 05:45 PM
15 0 0
Share this article:कुसगाव : येथील श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ एज्युकेशन व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने १६ व १७ फेब्रुवारी २०१९ रोजी दोन दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. शैक्षणिक प्रक्रिया व नाविन्यपूर्ण अध्ययन-अध्यापन हा चर्चासत्राचा विषय होता.

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड येथील मराठवाडा विद्यापीठाचे सहाय्यक प्राध्यापक, बीजभाषक डॉ. महेश जोशी, सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या एज्युकेशन विभागाच्या संचालिका डॉ. आशा बोकील, संकुलाचे संचालक डॉ. एम. एस. गायकवाड, अहमदनगर येथील विद्या प्रतिष्ठानच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य आणि चर्चासत्राचे मार्गदर्शक तज्ञ डॉ. रवींद्र चौबे, मुंबईतील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. संदीप बोडके, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. देसाई यांच्या हस्ते ‘आयएसबीएन’प्राप्त चर्चासत्र पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. त्यामध्ये एकूण ३८ संशोधनपर लेखांचे संकलन आहे.समारंभाचे प्रमुख पाहुणे महेश जोशी यांनी पतंजली ते दलाई लामांपर्यंतच्या उदाहरणासह काश्मिरमध्ये पुलवामातील भ्याड हल्ल्याचे संदर्भानुसार विश्लेषण केले. या चर्चासत्रामध्ये ४० सहभागींनी आपल्या संशोधन लेखांचे वाचन केले. मान्यवरांचे स्वागत प्राचार्य डॉ. एस. बी. देसाई यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. कावेरी शेंडे यांनी केले. प्रा. बी. ए. शिंगाडे यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Jayawant Desai About 212 Days ago
Such educational activities are important step towards advancement of education as technology
0
0

Select Language
Share Link
 
Search