Next
‘दहशतवादाविरोधात एकत्र येऊन कृती करण्याची गरज’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
BOI
Monday, February 25, 2019 | 01:07 PM
15 0 0
Share this article:

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे

सोल : ‘आता दहशतवादाविरोधात जगाने बोलण्यापेक्षा, एकत्र येऊन कृती करण्याची अधिक गरज आहे,’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच दक्षिण कोरियाची राजधानी सोल इथे केले. दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे यांच्या समवेत पत्रकार परिषदेत मोदी बोलत होते. दहशतवादाविरोधातील लढ्यासाठी दक्षिण कोरियाने भारताला पाठींबा दिला असून, जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला आहे. 

‘पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याबद्दल सात्वंना व्यक्त केल्याबद्दल आणि दहशतवादाविरोधातील भारताच्या लढ्याला पाठिंबा दिल्याबद्दल मी अध्यक्ष मून यांचे आभार मानतो. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी दोन्ही देशांनी सहकार्य वाढविण्याचे ठरविले असून, आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील सहकार्य वाढविण्याचे प्रयत्न करण्याबद्दल सहमती व्यक्त केली आहे,’ असेही मोदी यांनी नमूद केले. 

‘दक्षिण कोरिया हा भारताचा आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा भागीदार असून, उभय देशांमधील व्यापार आणि गुंतवणूक वाढत आहे,’ असेही मोदी म्हणाले.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मानाचा ‘सोल शांतता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
मोदी यांना सोल शांतता पुरस्कार प्रदान 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या वेळी मानाचा ‘सोल शांतता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि जागतिक अर्थवाढीसाठी मोदी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘सोल पीस फाउंडेशन’तर्फे हा पुरस्कार दिला जातो. मोदी यांच्या कार्याचा आढावा घेणारा एक लघुपटही या वेळी दाखविण्यात आला. ‘हा पुरस्कार भारतीय जनतेच्या वतीने स्वीकारत आहे,’ असे मोदी यांनी या वेळी सांगितले. 

दोन्ही देशांदरम्यान सहा करार 
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून यांनी व्यापार, गुंतवणूक, सुरक्षा, ऊर्जा, अंतराळ संशोधन, स्टार्टअप, अंतर्गत सीमा संघर्ष आदी मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा केली. पायाभूत सुविधा, स्टार्टअप, प्रसारमाध्यमे, आंतरराष्ट्रीय गुन्हे आदी क्षेत्रातील सहा सामंजस्य करार या वेळी करण्यात आले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search