Next
‘सायकलिंग’ला प्रोत्साहन देण्यासाठी ‘एलिमेंट रिटेल’चा जायंटशी करार
प्रेस रिलीज
Wednesday, August 08, 2018 | 03:56 PM
15 0 0
Share this story

‘एलिमेंट रिटेल’ आणि ‘जायंट मॅन्युफॅक्चरर्स’ने सहकार्य करार केला आहे. या वेळी ‘जायंट मॅन्युफॅक्चरर्स’चे सीएसओ जॉन कू, एलिमेंट रिटेलचे व्यवस्थापकीय संचालक अदित्य बाफना, ‘जायंट’चे अध्यक्ष बोनी टू, ‘एलिमेंट रिटेल’चे कार्यकारी संचालक वरुण बगाडीया व जायंटच
मुंबई : सध्या भारतात फिटनेसबद्दलची जागरूकता वाढीस लागली असून, विशेषतः १६ ते ४५ वर्षे या वयोगटातील लोक, संपूर्ण शरीराला व्यायाम देणारा प्रकार म्हणून सायकल चालवण्याकडे वळत आहेत. अगदी छोट्या शहरांमध्येदेखील सायकलची मागणी वाढत आहे, हे लक्षात घेऊन, ‘एलिमेंट रिटेल’ या फिटनेस उपकरणे उपलब्ध करणाऱ्या कंपनीने जगातील सर्वात मोठी सायकल बनवणारी कंपनी ‘जायंट मॅन्युफॅक्चरर्स’ कंपनीबरोबर सहकार्य करार केला आहे. या वेळी ‘जायंट मॅन्युफॅक्चरर्स’ कंपनीचे सीएसओ जॉन कू, एलिमेंट रिटेलचे व्यवस्थापकीय संचालक अदित्य बाफना, जायंट मॅन्युफॅक्चरर्सचे अध्यक्ष बोनी टू,  एलिमेंट रिटेलचे कार्यकारी संचालक वरुण बगाडीया व ‘जायंट’च्या सिमोन लिन उपस्थित होते. 

याद्वारे व्यायामप्रेमी ग्राहकांना अधिक व्यापक, सर्वसमावेशक अनुभव देण्याचा कंपनीचा उद्देश आहे. कंपनीने अगोदरच अॅसिक्स, स्पीडो आणि अॅपलसारख्या प्रमुख ब्रँडसशी सहयोग केला आहे.

याबाबत अधिक माहिती देताना ‘एलिमेंट रिटेल’चे व्यवस्थापकीय संचालक अदित्य बाफना म्हणाले, ‘सायकलिंगच्या जगातील सर्वोत्कृष्ट ब्रॅंडशी सहयोग करताना आम्हाला गौरव वाटतो आहे. जायंटची उत्पादने म्हणजे अत्याधुनिक तंत्रज्ञान, अनुकूल डिझाइन आणि उत्कृष्ट दर्जाचे मटेरियल यांचा उत्कृष्ट संयोग आहे. त्यांच्या सायकली केवळ वेगवान नाहीत, तर आरामदायक, आकर्षक आणि चालवण्यास अत्यंत सुलभ अशा आहेत. त्यांच्या सहकार्याने आम्ही देशात सायकल चालवण्याची संस्कृती अधिक विकसित करू शकू.’ 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link