Next
काचखड्यांची नक्षी
BOI
Tuesday, May 14, 2019 | 11:05 AM
15 0 0
Share this article:

जीवनात अनेक अनुभव येत असतात. अनेक प्रसंग घडत असतात. त्यात जाणवलेली रूपे, त्याच्याशी निगडित आठवणी, विचार यांची गुंफण प्राजक्ता पटवर्धन यांच्या ‘काचखड्यांची नक्षी’तून विणली आहे. अमेरिकेत पहिल्यांदा जाताना आपला देश, गाव, घर सोडावे लागणार असल्याने होणारी घालमेल व नंतर पतीच्या भेटीची हुरहूर ‘फ्लाइंग टू यूएस’मधून व्यक्त केली आहे. ‘हू आय एम’मध्ये शेजारी देश, तेथील नागरिक यांविषयी वाटणारी शत्रुत्वाची भावना सीमा ओलांडून गेल्यानंतर कशी गळून पडते, हे समजते. घरात घरटे करण्यासाठी जागा शोधणाऱ्या चिमणीची आणि बागेत आलेल्या बिनपंखांच्या पोपटाची गोष्ट अनुक्रमे ‘आणि तिनं जिंकलं...’ व ‘औटघटकेचा पाहुणा’मध्ये आहे. आपण रोज अनेक आवाज ऐकतो. या आवाजांचे वेगळेपण लेखिकेने ‘ठेवणीतील आवाज’मधून टिपले आहे. जेथे बालपण गेले, त्या घराबद्दलचं ममत्व ‘तासगावचं घर’मधून व्यक्त होते, तर बसप्रवासाची गंमत ‘अगं अगं बशी...’मध्ये अनुभवायला मिळते. असे विविध विषयांवरील २७ लेख या पुस्तकात आहेत. 

पुस्तक : काचखड्यांची नक्षी
लेखक : प्राजक्ता पटवर्धन
प्रकाशन : पृथ्वीराज प्रकाशन, पुणे
पृष्ठे : १२८
मूल्य : २०० रुपये

(‘काचखड्यांची नक्षी’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.) 

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search