Next
पत्रकार वरुणराज भिडे पुरस्कार जाहीर
सुनील चावके, सुशांत सांगवे, विनायक करमरकर आणि अद्वैत मेहता यंदाचे मानकरी
BOI
Wednesday, April 10, 2019 | 04:59 PM
15 0 0
Share this article:


पुणे : ज्येष्ठ पत्रकार वरुणराज भिडे पुरस्कार यंदा सुनील चावके, सुशांत सांगवे, विनायक करमरकर आणि अद्वैत मेहता यांना जाहीर झाला आहे. मराठी पत्रकारितेत महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल ‘मुख्य पुरस्कार’, तर उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘आश्वासक पत्रकारिता पुरस्कार’ देण्यात येतो. 

‘यंदाचा मुख्य पुरस्कार दैनिक महाराष्ट्र टाईम्सचे नवी दिल्लीचे वरिष्ठ सहायक संपादक सुनील चावके यांना देण्यात येणार आहे. आश्वासक पत्रकारिता पुरस्कार (शहर विभाग) दैनिक लोकसत्ताचे मुख्य वार्ताहर विनायक करमरकर यांना, आश्वासक पत्रकारिता (ग्रामीण विभाग) पुरस्कार दैनिक सकाळ औरंगाबाद आवृत्तीचे वार्ताहर सुशांत सांगवे यांना, तर आश्वासक पत्रकारिता पुरस्कार (वृत्तवाहिनी विभाग) न्यूज १८ लोकमतचे पुणे ब्युरो चीफ अद्वैत मेहता यांना देण्यात येणार आहे,’ अशी माहिती पत्रकार वरुणराज भिडे मित्र मंडळाने पत्रकार परिषदेत दिली. या वेळी मंडळाचे अध्यक्ष उल्हास पवार, प्रकाश भोंडे, सतीश देसाई, अंकुश काकडे उपस्थित होते.

‘येत्या २८ एप्रिल २०१९ रोजी सकाळी ११ वाजता एस. एम. जोशी सभागृहात पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. यंदाचे हे पुरस्काराचे १९ वे वर्ष आहे. पत्रकार वरुणराज भिडे मित्रमंडळाचे अध्यक्ष व माजी आमदार उल्हास पवार हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील, तर कवी, साहित्यिक रामदास फुटाणे आणि संगमनेर येथील मालपाणी समुहाचे प्रमुख संजय मालपाणी प्रमुख पाहुणे असतील. दर वर्षीप्रमाणे यंदाही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदविका अभ्यासक्रमात प्रथम आलेल्या आणि चालू घडामोडी या विषयात विशेष प्राविण्य मिळवलेल्या अशा दोन विद्यार्थ्यांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने बक्षीसे देण्यात येणार आहेत,’ असेही या वेळी सांगण्यात आले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search