Next
‘मिटसॉट’तर्फे अ‍ॅल्युम्नाय कनेक्टचा विस्तार
प्रेस रिलीज
Wednesday, June 27 | 11:37 AM
15 0 0
Share this story



पुणे : एमआयटी स्कूल ऑफ टेक्नोलॉजी मॅनेजमेंटने  (मिटसॉट) आपल्या अ‍ॅल्युम्नाय कनेक्ट प्रोग्रामचा विस्तार केला आहे. आजी-माजी विद्यार्थ्यांमध्ये संवाद वाढावा हा या उपक्रमाचा हेतू आहे.

याविषयी माहिती देताना ‘मिटसॉट’चे प्रकल्प संचालक डॉ. मिलिंद पांडे म्हणाले, ‘या पुढाकारामध्ये माजी विद्यार्थी कार्यशाळांद्वारे सध्याच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आपले अनुभव सांगत आहेत. कॅंपस प्लेसमेंटसवर देखील मार्गदर्शन करत आहेत.​​ माजी विद्यार्थ्यांच्या सोशल नेटवर्किंग पेजेस आम्ही आमच्या वेबसाइटशी जोडले असून, त्यांचे सध्याचे कार्यस्थळ, कामकाजातील स्थान किंवा काही झालेले बदल याबाबत विद्यार्थी अपडेट राहू शकतात. या वेबसाइटवर विद्यार्थी देखील नोंदणीकृत असल्यामुळे ते माजी विद्यार्थ्यांशी डिजिटली देखील संवाद साधू शकतात.’

ते पुढे म्हणाले, ‘आता माजी विद्यार्थी उद्योगातील दिग्गजांसह आमच्या बोर्ड ऑफ स्टडीजमध्ये सहभागी झाले आहेत. याअंतर्गत वर्षभरात दोन-तीन वेळा बैठकी घेतल्या जातात व पुढील वाटचाली व सुधारणांवर चिंतन केले जाते. माजी विद्यार्थ्यांशी सध्याचे विद्यार्थी अधिक चांगल्या पद्धतीने संवाद साधू शकतील व त्यांचे यश आणि मार्गदर्शनामुळे प्रोत्साहित होऊ शकतील.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link