Next
पुणे येथे ‘ईबीजे वर्ल्ड फेस्ट’चे आयोजन
प्रेस रिलीज
Monday, May 28, 2018 | 04:57 PM
15 0 0
Share this article:

पत्रकार परिषदेत माहिती देताना डावीकडून हसन शेख, नारायणकुमार फड व प्रशांत ताम्हाणे.पुणे : ‘लाइफस्टार ग्लोबल वेल्फेअर फाउंडेशन व जयहिंद परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आणि भारतदर्शन वर्ल्ड सेंटर व आर्टिस्ट ग्लोबल कौन्सिल यांच्या सहकार्याने दोन दिवसीय ‘एज्युकेशन बिझनेस जॉब (ईबीजे) वर्ल्ड फेस्ट’चे आयोजन करण्यात आले आहे. दोन आणि तीन जून २०१८ रोजी घोले रस्त्यावरील नेहरू सांस्कृतिक सभागृहात होणाऱ्या या फेस्टिवलमधून शिक्षण, व्यवसाय आणि नोकरीच्या संधीसाठी प्रयत्न केला जाणार आहे,’ अशी माहिती संयोजक भारतदर्शन वर्ल्ड सेंटरचे नारायणकुमार फड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या प्रसंगी संयोजन समितीचे सदस्य हसन शेख, प्रशांत ताम्हाणे व आकांक्षा जोशी यांच्यासह आदी सदस्य उपस्थित होते. हा फेस्टिव्हल सर्वांसाठी विनामूल्य आहे. शिक्षण, उद्योग, नोकरी मेळावा, कौशल्य प्रशिक्षण, संशोधन, परिसंवाद, स्पर्धा आणि पुरस्कार सोहळा अश्या वैविध्यपूर्ण ‘ईबीजे वर्ल्डफेस्ट’चे उद्घाटन दोन जून २०१८ रोजी माणिकचंद समूहाच्या कार्यकारी संचालक जान्हवी धारीवाल आणि वरुण डेव्हलपर्सचे संचालक रूपेश सामत यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी कला व हस्तकला प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. या वेळी युवा संत हिंदुभूषण श्यामजी महाराज, ह्युमन वेलफेअर कॉसमॉस ऑर्गनायझेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मधुसूदन घाणेकर, ज्ञानप्रसारक मंडळाचे संस्थापक ग. पा. ढाकणे, पुण्याचे युवा विधिज्ञ गिरीश मुरकुटे, आयुर जेनिक्स आयुर्वेदाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत पाटील, प्रसिद्ध चित्रकार विनय बागडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.   

तीन जून २०१८ रोजी बक्षीस वितरण सोहळा व फेस्टिवलच्या समारोप केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या सल्लागार समितीचे सदस्य लतीफ मगदूम, चाटे शिक्षण समूहाचे संचालक प्रा. फुलचंद चाटे यांच्या उपस्थितीत होणार असून, त्यांच्या हस्ते विविध क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना ‘लाइफस्टार राष्ट्रीय पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. बक्षीस वितरण सोहळ्याचे अध्यक्षस्थान आमदार उल्हास पवार भूषवतील.

या वेळी कौशल्य विकास विभागाचे उपसंचालक शरद अंगने, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे वाणिज्य विद्याशाखेचे माजी अधिष्ठाता प्रा. डॉ. सुधाकरराव जाधवर, इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशनचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालययाचे उपाध्यक्ष डॉ. एस. एन पठाण उपस्थित राहणार आहेत.   

‘वर्ल्ड फेस्ट’दरम्यान दोन जूनला ‘तुमची स्वप्ने तुमचे जीवन’वर सुप्रिया पुजारी, ‘सक्सेस लोडिंग... बी अ मास्टर युअरसेल्फ’वर विनिता चोप्रा, ‘स्पर्धा परीक्षा’वर प्रा. राम वाघ, ‘आरोग्य, आनंद आणि मानसिकता’ यावर अंजना जैन, ‘उद्योजकता’वर श्रीकांत आव्हाड या तज्ञ लोकांचे सेमिनार दुपारी १२. २० ते रात्री आठ या वेळेत होणार आहेत. तीन जून रोजी ‘शिक्षण.. देशात की परदेशात’वर डॉ. तुषार देवरस, ‘नोकरीच्या संधी’वर प्रा. विद्याभूषण आर्या, ‘बिकम अ स्टार ऑफ युअर लाइफ’वर अविनाश चाटे, ‘जगभरातील संधी’ यावर डॉ. कुलजित उप्पाल, ‘नो युअर चाईल्ड, ग्रो युअर चाईल्ड’र रशिदा खिळवाला यांचे सेमिनार सकाळी ११ ते सायंकाळी पाच या दरम्यान होतील.

वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांना एका व्यासपीठावर आणून गरजूंना मार्गदर्शन करण्याचा आणि त्यांना विविध संधी उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न असल्याचे फड यांनी सांगितले.

‘ईबीजे वर्ल्ड फेस्ट’विषयी :
दिवस : दोन व तीन जून २०१८
वेळ : सकाळी ११ ते सायंकाळी पाच
स्थळ : नेहरू सांस्कृतिक सभागृह, घोले रस्ता, पुणे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search