Next
पुण्यात ध्यानधारणा सत्राचे आयोजन
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ध्यानधारणातज्ज्ञ ब्रह्मर्षी सुभाष पत्री करणार मार्गदर्शन
प्रेस रिलीज
Thursday, January 03, 2019 | 03:19 PM
15 0 0
Share this article:

पुणे : विविध प्रकारच्या ताणतणावांना सामेारे जाण्यासाठी ध्यानधारणा हा प्रभावी मार्ग असल्याचे लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ध्यानधारणातज्ज्ञ ब्रह्मर्षी सुभाष पत्री यांच्या बासरीवरील संगीताच्या आधारावरील ध्यानधारणा सत्राचे आयोजन सात व आठ जानेवारी २०१९ रोजी विनामूल्य करण्यात आले आहे.

ब्रह्मर्षी सुभाष पत्री यांचे दोन कार्यक्रम पुण्यात होणार असून, सात जानेवारीला सायंकाळी ५.३० वाजता बासरीवादनातून ध्यानधारणेचा कार्यक्रम ब्रेमेन चौक, औंध येथील पं. भीमसेन जोशी कलामंदिरात होणार आहे. दुसरा कार्यक्रम आठ जानेवारीला सकाळी १० वाजता गांजवे चौकातील पुणे श्रमिक पत्रकार संघातील डॉ. चंद्रशेखर सभागृहात होणार आहे.

सध्या शहरी जीवनात सर्व स्तरांवर होत असणारे ताण, प्रदूषण, जीवनातली अनिश्‍चितता आणि अनारोग्य ध्यानधारणा करण्यासाठी मुख्य कारणे आहेत. यातून विचलित होणारे मन शांत होण्यास तसेच, दृढ, निश्‍चियी व निरोगी राहण्यास मदत होते. या पार्श्‍वभूमीवर संगीताच्या माध्यमातून ध्यानधारणा या कार्यक्रमात ब्रह्मर्षी सुभाष पत्री हे उपस्थितांना ध्यानधारणा कशी करावी याचे मार्गदर्शन करणार आहेत; तसेच ध्यानधारणेचे महत्त्व यावर विचार मांडणार असून, उपस्थितांच्या शंकांचे निरसनही करणार आहेत.

या दोन्ही कार्यक्रमांचा लाभ जास्तीत जास्त पुणेकरांनी  घ्यावा, असे आवाहन पुण्यातील पिरॅमिड स्पिरिच्युअल सोसायटी मुव्हमेंटचे अध्यक्ष दीपक संघवी आणि अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. धंपाल भामरे यांनी केले आहे. 

कार्यक्रमाविषयी :
दिवस :
सात जानेवारी २०१९
वेळ : सायंकाळी ५.३० वाजता
स्थळ : पं. भीमसेन जोशी कलामंदिर, ब्रेमेन चौक, औंध
दिवस : आठ जानेवारी २०१९
वेळ : सकाळी १० वाजता
स्थळ : डॉ. चंद्रशेखर सभागृह, पुणे श्रमिक पत्रकार संघ, गांजवे चौक, पुणे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search