Next
शिस्त : एक अवघड ‘वळण’वाट!
BOI
Tuesday, December 05 | 11:59 AM
15 0 0
Share this story

मुलांना लहानाचे मोठे करणे ही पालकांसाठी एक महत्त्वाची आणि तितकीच अवघड कामगिरी असते. घरातील समस्या, नवी जीवनशैली आदींशी सांगड घालून मुलांना शिस्त लावण्यासाठी त्यांची मानसिकता समजावून घेणे आवश्यक असते. ही मानसिकता समजावून घेण्यासाठी डॉ. विद्या दामले यांचे हे पुस्तक पालकांना मदत करते.

मुलांना शिस्त लावण्यासाठी पालकांनी प्रथम स्वतःत बदल करायला हवा. अहंकाराला आळा घालावा, असे त्या सांगतात. मुलभूत शिस्त-कौशल्ये कोणती या विषयावर चर्चा केली आहे.

मुलांच्या चिडचिडीला, रागाला वेळीच आवर घालण्यासाठी काय करावे, याविषयी सल्ला दिला आहे. स्व-नियंत्रण प्राप्त करण्यासाठी आवश्यक असलेल्या क्षमता सांगितल्या आहेत. एकूणच मुलांच्या मनाला आकार देण्यासाठी सुलभ व प्रवाही भाषेत केलेले हे लेखन.  
 
प्रकाशक : मेनका प्रकाशन
पाने : १२६
किंमत : १८० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link