Next
डेव्हिड रँझ मुंबईतील अमेरिकी वकिलातीचे नवे प्रमुख
BOI
Tuesday, August 27, 2019 | 02:50 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : मुंबईतील अमेरिकी वकिलातीच्या प्रमुखपदी डेव्हिड रँझ रुजू झाले आहेत. २६ ऑगस्ट रोजी त्यांनी पदभार स्वीकारला. त्यांच्या आधी एडगर्ड केगन या पदावर होते. 

या पदावर रुजू होण्याआधी रँझ अमेरिकेच्या वॉशिंग्टनस्थित परराष्ट्र मंत्रालयातील दक्षिण आणि मध्य आशिया विभागात उपसहायक सचिव म्हणून कार्यरत होते. भारत, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका, भूतान, मालदीव आदी देशांमधील घडामोडींवर  लक्ष ठेवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. त्याआधी पाकिस्तानसाठीचे उपसहायक सचिव म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. १९९२पासून परराष्ट्र सेवेत कार्यरत असलेले रँझ मूळचे न्यूयॉर्कचे आहेत. इजिप्त, इराक, मोरोक्को, जेरुसलेम आणि पाकिस्तान आदी देशांत त्यांनी काम केले आहे. 

‘पश्चिम भारतात अमेरिकेचे प्रतिनिधित्व करायला मिळणे हा सन्मान आहे. भारत-अमेरिका संबंध अनेक स्तरांवर, विशेषतः आर्थिक क्षेत्रांमध्ये आघाडीवर आहेत. त्याचबरोबर दोन्ही देशांच्या नागरिकांमध्ये स्नेह आहे. अशा पोषक वातावरणात भारत-अमेरिका भागीदारी पुढच्या टप्प्यावर न्यायला मला नक्कीच आवडेल,’ अशी भावना रँझ यांनी पदभार स्वीकारल्यानंतर व्यक्त केली. 

पत्नी टेली लिंड आणि दोन मुलांसह रँझ भारतात आले आहेत. श्रीमती टेली लिंड ‘यूएसएड’मध्ये परराष्ट्र सेवा अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. 

(To read this news in English, please click here.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search