Next
गणी गण गणांत बोते
BOI
Wednesday, September 05 | 03:42 PM
15 0 0
Share this story

गजानन महाराजांच्या पावन वास्तव्यामुळे वऱ्हाडातील खामगाव तालुक्यातील शेगाव तीर्थक्षेत्री म्हणून प्रसिद्धीस आले आहे. गजानन महाराजांच्या समाधीच्या दर्शनासाठी तेथे सतत भाविकांच्या ओघ सुरू असतो. गजानन महाराजांच्या अवतार कार्याची माहिती व माहिती ल. हा. पाठक यांनी ‘गणी गण गणांत बोते’ यातून कादंबरीच्या स्वरूपात दिली आहे.

माघ वद्य ७ (२३ फेब्रुवारी १८७८) रोजी शेगावात पातुरकर यांच्या लग्नघराच्या बाहेर टाकलेले पत्रावळीतील उष्टन्न खाताना एक १४-१५ वर्षांचा मुलगा बंकटलाल अग्रवाल व दामोदर कुलकर्णी या जिवाभावाच्या मित्रांच्या दृष्टीस पडला. दिगंबर अवस्थेतील त्याचे अलौकिक व्यक्तिमत्त्व पाहून हा असाधारण मुलगा असल्याचे त्याच्या लक्षात आले. तो मुलगा म्हणजे श्री गजानन महाराज. त्यांच्या अधिकाराचा व चमत्काराचा अनुभव गावकऱ्यांना पहिल्यापासून येत गेला.

महाराजांची कीर्ती आजूबाजूच्या खेडयापाड्यात पोचली. महाराजांच्या सामर्थ्याची अनुभूती अनेकांना आली. भक्तीच्या या कहाणीत त्या वेळच्या म्हणजे देश पारतंत्र्यात असतानाच्या राजकीय घडामोडीही गजाजन महाराजांच्या अनुषंगाने या कादंबरीत येतात.

प्रकाशक : पद्मगंधा प्रकाशन
पाने : २६९  
किंमत : २७० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link