Next
‘ठाकरे’चे पहिले गाणे प्रदर्शित
ठाकरे कुटुंबियांच्या उपस्थितीत बहुचर्चित सिनेमाचे पहिले गाणे प्रकाशित
BOI
Monday, January 14, 2019 | 04:35 PM
15 0 0
Share this story


मुंबई : संजय राऊत प्रस्तुत व लिखित बहुचर्चित ‘ठाकरे’ चित्रपट येत्या २५ जानेवारीला प्रदर्शित होणार असून या चित्रपटातील पहिले हिंदी गाणे ‘आया रे सबका बाप रे..’ नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील झंझावाती व्यक्तिमत्त्व बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट या चित्रपटातून उलगडला जाणार आहे. प्रकाशनानंतर अतिशय कमी वेळात या गाण्याने यु-ट्युबवर प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता आहे. 

मुंबईत संजय राऊत आणि ठाकरे कुटुंबियांच्या उपस्थितीत नुकतेच या चित्रपटाचे पहिले गाणे प्रदर्शित करण्यात आले. या वेळी चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती, शिवाय या चित्रपटाला संगीत दिलेले रोहन गोखले आणि रोहन प्रधान, अवधूत गुप्ते हेदेखील उपस्थित होते. अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेले बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट असल्याने महाराष्ट्रातील जनतेला या चित्रपटाबाबत विशेष उत्सुकता आहे. 

२०१८-१९ ही वर्षे चित्रपट सृष्टीसाठी खऱ्या अर्थाने बायोपिकची वर्षे ठरली. मागील वर्षी मराठी रंगभूमीवरील पहिले नाट्यकर्मी काशीनाथ घाणेकर यांच्यावरील चित्रपट हिट ठरला असतानाच आता आणखी एका मराठी माणसाच्या जिव्हाळ्याच्या व्यक्तिमत्त्वावर चित्रपट येत आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत, हे सांगण्याची अर्थात गरज नाही. त्यातच या पहिल्या गाण्याने सर्वांची मने जिंकली आहेत. 

अभिनेता नवाजुद्दिन सिद्दिकी या चित्रपटात बाळासाहेबांच्या भूमिकेत दिसणार असून अभिनेत्री अमृता राव ही माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. दिग्दर्शक अभिजित पानसे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link