Next
आपत्ती, निवारणासाठी जग्वार लँड रोव्हरतर्फे विशेष वाहन
रॅपिड रिस्पॉन्स संस्थेला डिस्कव्हरी स्पोर्ट गाडी भेट
BOI
Saturday, June 29, 2019 | 03:44 PM
15 0 0
Share this article:

रॅपिड रिस्पॉन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहम्मद फारूख यांच्याकडे डिस्कव्हरी स्पोर्ट ही गाडी सुपुर्द करताना जग्वार लँड रोव्हर इंडिया लि.चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रोहित सुरी

मुंबई : आपत्ती निवारणासाठी मदत करण्याकरता जग्वार लँड रोव्हर इंडियाने रॅपिड रिस्पॉन्स या संस्थेला लँड रोव्हर डिस्कव्हरी स्पो‍र्ट गाडी भेट दिली आहे. आपत्ती व्यवस्थापन व मदतकार्यासाठी उपयुक्त असे हे सुविधायुक्त वाहन आहे. संकटात सापडलेल्या लोकांना अन्न, पाणी, तसेच वैद्यकीय मदत देण्यासाठी या वाहनाचा उपयोग होईल. 

डिस्कव्हरी स्पोर्टमध्ये टेरेन रिस्पॉन्स, अॅप्रोच अँगल, डिपार्चर अँगल आदी सर्वोत्त‍म वैशिष्ट्ये आहेत. ज्यामुळे मदतकार्य करणाऱ्या तुकडीला खडतर मार्गांवरून सहजपणे पुढे जाता येईल. लगेज कॅरिअर, लगेज पार्टिशन, टो रोप अशा सुविधांनी ही गाडी सुसज्ज आहे.  

जग्वार लँड रोव्हर इंडिया लि.चे (जेएलआरआयएल) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रोहित सुरी म्हणाले, ‘डिस्कव्हरी स्पोर्टसारख्या लँड रोव्हर वाहनामुळे महापूरासारख्या नैसर्गिक आपत्तीत मोठी मदत होणार आहे. वेगाने घटनास्थळी पोहोचण्यासह मदतकार्यासाठी आवश्यक साहित्य नेण्यासाठी हे वाहन उपयुक्त ठरेल. जग्वार लँड रोव्हरला भारतात दहा वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आम्ही ही भेट दिली आहे. लोकांना मदत करण्याच्या कामात हातभार लावण्याची संधी मिळाल्याबद्दल आम्हाला अतिशय आनंद आणि अभिमान वाटत आहे.’

रॅपिड रिस्पॉन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहम्मद फारूख म्ह्णाले, ‘आम्ही  नैसर्गिक आपत्तींना बळी पडलेल्या लोकांना त्वरित सर्व ती मदत देण्याचा प्रयत्न करतो. लँड रोव्हरची क्षमता व तंत्रज्ञानाचे पाठबळ लाभल्यामुळे आम्ही आपत्ती निवारणात आता अधिक जलद आणि प्रभावी काम करू शकू.’    
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search