Next
‘बिगर गॅस जोडणी रेशनकार्डधारकांना शासनामार्फत गॅस जोडणी’
कोकण विभागीय आयुक्त शिवाजीराव दौंड यांची माहिती
प्रेस रिलीज
Wednesday, July 31, 2019 | 05:35 PM
15 0 0
Share this article:

नवी मुंबई : ‘कोकण विभागातील बिगर गॅस जोडणी धारकांना राज्य शासनामार्फत गॅस जोडणी वितरीत करण्यासाठी राज्य शासनाने स्वतंत्र योजना आखली आहे. यासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध करण्यात आली आहे. या कुटुंबांनी नजिकच्या तहसील कार्यालयात अथवा जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांशी संपर्क साधून गॅस जोडणी करून घ्यावी,’ असे आवाहन कोकण विभागाचे महसूल आयुक्त शिवाजीराव दौंड यांनी केले आहे.

कोकण विभागात रेशनकार्डधारक असूनही गॅस कनेक्शन नाही असे एकूण चार लाख ७१ हजार ०१ एवढी कुटुंब आहेत. त्यात रत्नागिरीत एक लाख २८ हजार ७५२, रायगडमध्ये एक लाख नऊ हजार ९९९, पालघरमध्ये ९६ हजार ४७२, ठाणे जिल्ह्यात ७९ हजार १५२, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५६ हजार ६२६ कुटुंबांचा समावेश आहे. 

या योजनेचे पात्रता व निकष असे आहेत : एसईसीसी यामध्ये अर्जदाराचे/कुटुंब सदस्याचे नाव असणे आवश्यक आहे. अर्जदार कुटुंबातील स्त्री असणे आवश्यक असून तिचे वय १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. अर्जदाराच्या कूट सदस्याचे आधार कार्ड अनिवार्य आहे. बचत खाते एनएसीएच बॅंक मॅप असावे. उज्ज्वला केवायसी आणि पीओए/पीओआय (उपलब्ध असल्यास पासपोर्ट आकाराचा फोटो आलेख), डी-डुप्लिकेशन अर्जदाराच्या/कुटुंबाच्या नावावर एलपीजी कनेक्शन असता कामा नये. रेशन कार्ड (पर्यायी) असावे.

‘चुलमुक्त, धुरमुक्त महाराष्ट्र’ ही संकल्पना राबविण्यासाठी  कोकण विभागातील ज्या कुटुंबाकडे गॅस जोडणी नाही, अशा रेशनकार्डधारक कुटुंबांनी जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन दौंड यांनी केले आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search