Next
‘निप्रो डायलिसिस’तर्फे आरोग्यविषयक शिबिर
प्रेस रिलीज
Wednesday, April 04, 2018 | 01:55 PM
15 0 0
Share this story

पुणे : निप्रो डायलिसिस ट्रीटमेंट अँड ट्रेनिंग सेंटरतर्फे किडनी विकारग्रस्त रुग्णांसाठी ‘आयुष्यमान भव’ हे मोफत आरोग्यविषयक मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले असून, यात तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन केले जाणार आहे.

येत्या रविवारी (ता. आठ एप्रिल) बावधन येथील निप्रो डायलिसिस ट्रीटमेंट अँड ट्रेनिंग सेंटरमध्ये आयोजित केलेल्या या शिबिरात सकाळी साडेदहा ते दुपारी एक या वेळेत तज्ञ नेफ्रोलॉजिस्ट आणि रिनल स्पेशालिस्ट डॉ. तुषार वारके मार्गदर्शन करणार असून, या वेळी आहारतज्ञ देखील रुग्णांना मार्गदर्शन करणार आहेत; तसेच योग व ताणतणाव व्यवस्थापन कसे करावे याबद्दलही मार्गदर्शन केले जाणार आहे.

या मार्गदर्शन शिबिरात किडनीविकारग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनाही कशी काळजी घ्यायची याबद्दल  सविस्तर माहिती दिली जाणार आहे. या विनामूल्य मार्गदर्शन शिबिरात सहभागी होण्यासाठी पूर्व नावनोंदणी करणे आवश्यक आहे.


शिबिराविषयी :
दिनांक : रविवार, आठ एप्रिल २०१८
वेळ : सकाळी १०.३० ते दुपारी एक वाजेपर्यंत
स्थळ : निप्रो डायलिसिस ट्रीटमेंट अँड ट्रेनिंग सेंटर, ऑफिस नं. ३०१, ३०६ व ३०७. तिसरा मजला, ललाणी क्वान्टम, चेलाराम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वर, मुंबई-पुणे बायपास रोड, पाटील नगर, बावधन, पुणे ४११ ०२१.
नावनोंदणीसाठी संपर्क : ८८८८८ ४३९०५, (०२०) ६७९२ ८७००, १८०० २०९ ५२००.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link