Next
मौजे आंदेगाव येथे काँक्रीटच्या रस्त्याचे उद्घाटन
नागेश शिंदे
Monday, February 11, 2019 | 05:27 PM
15 0 0
Share this storyहिमायतनगर : हदगाव-हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या मौजे आंदेगाव येथील सिमेंट-काँक्रीटच्या रस्त्याचे उद्घाटन हिमायतनगरचे नगराध्यक्ष कुणाल राठोड यांच्या हस्ते झाले.

१० फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सरपंच दत्ता गटकपवाड यांनी भूषविले. या वेळी विशेष अतिथी म्हणून गजानन चायल, नागेश शिंदे उपस्थित होते.गेल्या काही वर्षांत हिमायतनगर तालुक्यातील मौजे आंदेगाव रस्ता खराब झाला होता, ही बाब लक्षात घेऊन आमदारांनी गावातील अंतर्गत रस्ते नव्याने करण्याचा निर्णय घेतला होता. त्या नंतर पाठपुराव्याअंती त्यांनी १२ लाखांचा निधी प्राप्त करून दिला. त्यानंतर हे रस्ते पक्के करण्यात आले. हे नव्याने करण्यात आलेले रस्ते जनतेसाठी खुले करण्यात आले. आमदार पाटील सध्या दुखवट्यात असल्याने या कार्यक्रमाला उपस्थित राहू न शकल्याबद्दल दिलगिरी व्यक्त नगराध्यक्ष राठोड यांनी येणाऱ्या काळात आमदार आंदेगाव गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही आमदारांच्या वतीने दिली.या प्रसंगी आंदेगाव तंटामुक्ती अध्यक्ष विठ्ठलराव देशमवाड, पोलिस पाटील मारोतराव नलकंठे, सरपंच उत्तम उप्पलवाड, कानबाराव नाईक, हरीराम कटकवाड, प्रकाश दासेवार, संभाजी बक्केवाड, कैलास बासेवाड, गजानन बासेवाड, साईनाथ देशमवाड, उत्तमराव राऊत, प्रदीप भूतणर, बालाजी नरवाडे, रामदास पोलसवाड, पांडुरंग काईतवाड, अमोल नाईक, शंकर भुसावळे, संतोष नाईक, बाबुराव कटकमवाड, सुभाष गटकपवाड, नरसिंग पोलसवाड, बाबुराव अक्कलवाड, राजाराम कटकमवाड, परमेश्वर कटकमवाड यांसह इतर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link