Next
हार्डवेअर हॅकेथॉनच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात
प्रेस रिलीज
Wednesday, July 10, 2019 | 03:26 PM
15 0 0
Share this article:

पुणे : पर्सिस्टंट सिस्टिम्सने एमएचआरडी, एआयसीटीई, एमआयसी आणि आयफोरसी यांच्या सहयोगाने स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०१९- हार्डवेअर एडिशन या उपक्रमाचे आयोजन केले आले आहे. हे हॅकेथॉन आठ ते १२ जुलै २०१९ या पाच दिवसांत भारतामधील १८ वेगवेगळ्या मुख्य केंद्रांमध्ये होणार आहे. भारतातील अभियांत्रिकी महाविद्यालयांतील विद्यार्थी या वर्षीच्या स्मार्ट इंडिया हॅकेथॉनच्या हार्डवेअर सत्रात भाग घेत नऊ केंद्रीय मंत्रालये व ४०हून अधिक खासगी क्षेत्रातील उद्योगांनी शोधलेल्या समस्यांवर हार्डवेअर आधारित वास्तविक सोल्युशन्स तयार करणार आहेत. 

पर्सिस्टंट सिस्टिम्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तसेच ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०१९’चे सहअध्यक्ष डॉ. आनंद देशपांडे म्हणाले, ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉनमुळे जगातील खर्‍या समस्यांवर काम करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार असून, याद्वारे अभिनव प्रारूप ते तयार करू शकतील. आम्ही हे पाहिले की, स्मार्ट इंडिया हॅकेथॉन हा सहभागी विद्यार्थ्यांच्या आयुष्यात परिवर्तन करणारा उपक्रम आहे. त्याच बरोबर त्यांच्या वर्गापलीकडे जाऊन शिकण्यासाठी व विचार करण्यासाठी हा उपक्रम प्रोत्साहित करतो.’

पर्सिस्टंट सिस्टिम्सचे चीफ आर्किटेक्ट व डिलिव्हरी हेड आणि ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०१९’च्या कार्यकारी समितीचे सचिव विवेक कुलकर्णी म्हणाले, ‘प्रभावी, समस्या सोडविणे, अभिनवता आणि कृतीतून शिकणे या गोष्टींसाठी तंत्रज्ञानाच्या विद्यार्थ्यांना एकत्रित आणणे हा स्मार्ट इंडिया हॅकॅथॉनचा उद्देश आहे. सॉफ्टवेअर सत्राच्या उत्तुंग यशानंतर आम्ही आठ ते १२ जुलै २०१९ दरम्यान हार्डवेअर सत्रातील अंतिम फेरी घेणार आहोत. ही फेरी भारतामधील १८ वेगवेगळ्या मुख्य केंद्रांमध्ये घेण्यात येणार आहे. एक लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे हे सत्र पूर्वीच्या सत्रापेक्षा पाचपटीने मोठे असणार आहे. दीड हजार अंतिम स्पर्धक, नऊ केंद्रीय मंत्रालये व ४० खासगी क्षेत्रातील उद्योगांनी दिलेल्या १९८ कठिण समस्या सोडवतील, असा आम्हाला विश्वास आहे.’ 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search